Full Width(True/False)

फोनमधून गायब झाले आहे प्ले स्टोर? रिस्टोर करण्यासाठी जाणून घ्या या स्टेप्स

नवी दिल्ली : आज स्मार्टफोनमध्ये प्रत्येक कामासाठी एकतरी अ‍ॅप्स उपलब्ध असते. वेगवेगळ्या अ‍ॅप्समुळे काम करणे सोपे जाते. यूजर्सला अ‍ॅप्स इंस्टॉल आणि अ‍ॅक्सेस करण्यासाठी वर निर्भर राहावे लागते. वाचा: जर तुमच्या फोनमधून चुकीने किंवा एखाद्या कारणामुळे गायब झाल्यास समस्या निर्माण होते. अनेकदा प्ले स्टोर पुन्हा वापरता येत नाही. मात्र, काही सोप्या टिप्सद्वारे तुम्ही सहज गायब झालेल्या प्ले स्टोरला पुन्हा स्क्रीनवर पाहू शकता व अ‍ॅप्स डाउनलोड करता येतील. अनेकदा प्ले स्टोरला लाँग टच केल्याने अथवा डिसेबल ऑप्शनवर क्लिक झाल्याने मोबाइल मेन्यूमधून गायब होते. डिसेबल झाल्यास प्ले स्टोरला तुम्ही सहज एनेबल करू शकता. यासाठीच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या.
  1. सर्वात प्रथम मोबाइलच्या सेटिंग्समध्ये जा.
  2. सेटिंग्समध्ये अ‍ॅप्स पर्यायावर क्लिक करा.
  3. येथे खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला Play Store दिसेल.
  4. आता तुम्हाला Enable चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  5. या प्रोसेसनंतर प्ले स्टोर मोबाइल स्क्रीनवर दिसेल.
  6. प्ले स्टोरवर क्लिक करून तुम्ही सर्व अ‍ॅप्स अपडेट करू शकता.
  7. यामुळे तुमचा मोबाइल पूर्णपणे अपडेट होईल व मोबाइलवर आधीप्रमाणेच अ‍ॅप्स वापरता येईल.
दरम्यान, Zimperium च्या सुरक्षा तज्ञांनी आणखी एका मॅलवेअरबाबत माहिती दिली आहे. याद्वारे अँड्राइड स्मार्टफोन यूजर्सकडून लाखो डॉलर्सची चोरी केली जात आहे. हे थेट अ‍ॅप्सद्वारे फोनमधून पैसे चोरी करू शकते. यामुळे प्ले स्टोरवरून १३६ अ‍ॅप्सला हटवण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3myNUxZ