Full Width(True/False)

दिवाळीला गिफ्ट देण्यासाठी मस्त आहेत 'हे' फीचर फोन्स, किंमत खूपच कमी,पाहा लिस्ट

नवी दिल्ली : स्मार्टफोन आणि फीचर फोनवर फेस्टिव्ह सीजन दरम्यान मोठी सूट दिली जात आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कुणाला फोन गिफ्ट करण्याचा विचार करत असाल किंवा स्वतःसाठी नवीन फीचर फोन खरेदी करणार असाल. तर येथे आम्ही तुम्हाला काही उत्तम पर्यायांबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर. वाचा: : हा एक चांगला 4G फीचर फोन आहे. यात ड्युअल सिम सपोर्ट, KAI OS, २.४ इंच QVGA डिस्प्ले, २ MP प्रायमरी कॅमेरा, VGA फ्रंट कॅमेरा, Google असिस्टंट सपोर्ट, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक सारखे अॅप्स आहेत. हे ब्लूटूथ आणि एफएम रेडिओला देखील समर्थन देते. हे डिव्हाइस २,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. : हा फीचर फोन ड्युअल-सिम सपोर्ट, २. ४ इंच QVGA डिस्प्ले, ६४ MB RAM, १२८ MB स्टोरेज, 4G VoLTE, ब्लूटूथ 5.0, FM रेडिओ, MP3 प्लेयर, 0.3 MP रियर कॅमेरा आणि १,१५० mAh बॅटरीसह येतो. हे डिव्हाइस ३,४९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. Itel Magic 2 4G : हा 4G फीचर फोन फ्लिपकार्ट वरून २,४२५ रुपयांना खरेदी करता येईल . हा फोन २.४ इंच (२४० x ३२० पिक्सेल) क्यूव्हीजीए डिस्प्ले, टी 117 प्रोसेसर, १.३ MP रियर कॅमेरा आणि १,९०० mAh बॅटरीसह येतो. याव्यतिरिक्त, हे डिव्हाइस 2 G, 3G, 4G , वाय-फाय आणि ब्लूटूथ v2 ला देखील समर्थन देते. : या 4G फोनची किंमत १,९९९ रुपये आहे. तसेच यात तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दरमहा २ GB हाय स्पीड डेटा मिळतो. या ऑफरचा लाभ दोन वर्षांसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही हा फोन १,४९९ रुपयांना खरेदी केला तर तुम्हाला १ वर्षासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि २ GB डेटा मिळेल. डेटा संपल्यानंतरही युजर्स नेटमध्ये प्रवेश करू शकतील. पण, कमी वेगात. फोनमध्ये २.४ इंच QVGA डिस्प्ले, KaiOS, Facebook, WhatsApp, YouTube, JioTV आणि JioCinema सारखे अॅप्स, ५१२ MB रॅम, ४ GB स्टोरेज, २ MP रियर कॅमेरा आणि २,००० mAh बॅटरी आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AHZk7H