Full Width(True/False)

HONOR Band 6 वर १५०० रुपयाची सूट, आता या किंमतीत मिळतोय जगातील पहिला फुल स्क्रीन फिटबँड

नवी दिल्लीः ने गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये सर्वात आधी चीनमध्ये डेब्यू केले होते. मोठ्या डिस्प्लेचा जगातील सर्वात फुल स्क्रीन फिटबँड ने यावर्षी जूनमध्ये भारतीय बाजारात एन्ट्री केली होती. जर तुम्हाला हे खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. खरं म्हणजे चार महिन्यापूर्वी भारतात लाँच झालेल्या या बँडला आता खूपच मोठ्या सूट सोबत विकले जात आहे. मिळतेय इतकी मोठी सूट HONOR Band 6 ला भारतात ३ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीत लाँच केले होते. आता फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल मध्ये या फिटनेस ट्रॅकरला फक्त २ हजार ४९९ रुपयात विकले जात आहे. याचाच अर्थ ग्राहकांना पूर्ण १ हजार ५०० रुपयाची बचत करता येणार आहे. ही डील व्हियरेबलच्या तिन्ही कलर व्हेरियंट मेटियोराइट ब्लॅक, सँडस्टोन ग्रे आणि कोरल पिंकवर उपलब्ध आहे. ही ऑफर २३ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. परंतु, स्टॉक संपण्याआधी ऑर्डर दिल्यास ते फायदेशीर राहील. HONOR Band 6 काय आहे खास HONOR Band 6 ला जगातील पहिले फुल स्क्रीन फिटनेस ट्रॅकर म्हणून आणले गेले होते. यात १.४७ इंचाचा रेक्टांगुलर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 94x368 पिक्सल आणि यात १.५ डी ग्लास दिला आहे. हे १० स्पोर्ट्स मोड, ब्लड ऑक्सिजन लेवल मॉनिटरिंग, HUAWEI TruSeen 4.0 २४ तास हार्ट-रेट मॉनिटरिंग, HUAWEI TruSleep स्लीप मॉनिटरिंग, मासिक धर्म चक्र मॉनिटरिंग, नोटिफिकेशन अलर्ट, कॉल, मेसेज अलर्ट, अलार्म आणि अन्य सुविधेला सपोर्ट करते. वॉटर-रेसिस्टेंट (5ATM) वियरेबल ब्लूटूथ 5.0 कनेक्टिविटीचा उपयोग करतो. फुल चार्ज झाल्यानंतर १४ दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z0HlfV