नवी दिल्लीः सध्या स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी खूप सारे पैसे खर्च करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा पाच स्मार्टफोन्सची यादी देत आहोत. ज्या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. ज्यात कमालीचे फीचर्स दिले आहेत. या सर्व स्मार्टफोन्सला तुम्ही १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतात. रियलमी नार्जो 50i 5,000mAh ची बॅटरी आणि २५६ जीबी स्टोरेज पर्यंत मेमरीच्या या स्मार्टफोनची किंमत फक्त ७ हजार ४९९ रुपये आहे. याची खरी किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या फोनला बेस्ट डील अंतर्गत ६ हजार ९५० रुपयांपर्यंत लाभ, एक्सचेंज ऑफर मिळू शकतो. रेडमी 9i स्पोर्ट एचडी प्लस डिस्प्ले आणि 5,000mAh ची बॅटरीच्या या स्मार्टफोनला तुम्ही ९ हजार ९९९ रुपयांऐवजी ८ हजार ७९९ रुपयात खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफर मध्या तुम्ही या फोनवर ८ हजार २५० रुपयांपर्यंत बचत करू शकता. रियलमी C11 २०२१ मध्ये लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनला तुम्ही ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी सारखे खास फीचर्स मिळतील. याला ८ हजार ७९९ रुपयात खरेदी करू शकतील. याची खरी किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. एक्सचेंज ऑफर मिळाल्यास ८ हजार २५० रुपयाची बचत करू शकता. पोको M2 रीलोडेड ५१२ जीबी पर्यंत एक्सापँडेबल इंटरनल स्टोरेज आणि 5,000mAh ची बॅटरीचा हा स्मार्टफोन ११ हजार ९९९ रुपयाचा आहे. परंतु, फ्लिपकार्ट वरून या फोनला ९ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफर केल्यास ९ हजार ४५० रुपयाची बचत करू शकता. रियलमी C21Y १० हजार ९९९ रुपयाच्या किंमतीच्या या स्मार्टफोनला तुम्ही फ्लिपकार्टवरून ९ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेराचा सेटअप आणि 5,000mAh ची बॅटरी यासारखे फीचर्स मिळतील. एक्सचेंज ऑफर केल्यास तुम्हाला ९ हजार ४५० रुपयाची सूट मिळू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ATd3sI