मुंबई: प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर धक्कादायक आणि गंभीर प्रकारचे आरोप करण्यात येत आहे. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांनी ८ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक आरोप या प्रकरणातील पहिले साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केला आहे. आर्यनच्या अटकेचा संपूर्ण घटनाक्रम साईल यांनी नोटरीच्या स्वाक्षरीने केलेल्या शपथपत्रात मांडला असून त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असं असताना त्यांनी त्याच्या पदावर कार्यरत राहणं योग्य नसून त्यांनी राजीनामा द्यावा अशी, मागणी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते यांनी केली आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे अटकसत्र गाजत असतानाच त्यात रविवारी धक्कादायक ‘यू टर्न’ आला. साईल हे या प्रकरणातील अन्य साक्षीदार असलेले किरण गोसावी यांच्याकडं अंगरक्षक म्हणून दोन महिन्यांपासून काम करीत आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनीही वानखेडेंवर गंभीर आरोप केलेत. याच पार्श्वभूमीवर वानखेडे यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असं ट्विट हंसल मेहता यांनी केलं आहे. वानखेडेंनी आरोप फेटाळलेदरम्यान एनसीबी मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘प्रभाकर साईल हे या प्रकरणातील साक्षीदार असल्यानं व प्रकरण न्यायप्रविष्ट त्यांनी त्यांचे म्हणणं आणि हे शपथपत्र सोशल मीडियाऐवजी न्यायालयात मांडायला हवं होतं. तसेच या शपथपत्रातील काही मुद्दे हे दक्षतेशी निगडित आहेत. त्यामुळंच हे शपथपत्र पुढील कारवाईसाठी एनसीबीच्या महासंचालकांकडं पाठविण्यात आले आहे’, असे जैन यांनी स्पष्ट केलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pNZw3N
