नवी दिल्लीः Google ने अखेर नवीन Pixel फोनच्या लाँचिंगच्या तारखेचा खुलासा केला आहे. Pixel 6 आणि Pixel 6 Pro फोन ला कंपनी १९ ऑक्टोबर रोजी लाँच करणार आहे. याची घोषणा अधिकृत मेड बाय गुगल ट्विटर अकाउंटवरून करण्यात आली आहे. यात एक इंटरेक्टिव पेजची लिंक सुद्धा दिली आहे. या ठिकाणी तुम्ही नवीन युजर इंटरफेस पाहू शकता. जे फोन सोबत येणार आहे. सोबत एक एफएक्यू पेज सुद्धा पाहू शकता. जे तुमच्या फोन संबंधीत सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. Google ने खुलासा केला आहे की, लाइव्हस्ट्रीम एक लाइव्ह इव्हेंट होणार नाही. तर एक प्री-रिकॉर्डेड असेल. जर तुम्ही याला मिस केले तर तुम्ही याला नंतर सुद्धा पाहू शकता. Pixel 6 आणि Pixel 6 Pro आधी Google कस्टम मोबाइल चिप सोबत लाँच होतील. याला Tensor म्हटले जाते. Tensor चिप एक ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. यात Exynos 5G मॉडेम, अल्ट्रा-वाइडबँड सपोर्ट आणि वाय-फाय 6E असेल. Pixel 6 सीरीज मध्ये 120Hz डिस्प्ले सोबत अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि एक सेंटर्ड पंच मिळेल. प्रो मॉडल मध्ये तीन रियर कॅमेरे असतील. तर स्टँडर्ड मॉडल मध्ये दोन रियर कॅमेरे मिळतील. फोनमध्ये फास्ट चार्जिंगचे सपोर्ट मिळेल. या फोन सोबत Google १९ ऑक्टोबर रोजी नवीन पिक्सेल स्टँड वायरलेस चार्जरची घोषणा करणार आहे. दोन्ही फोन वर अँड्रॉयड १२ आउट ऑफ द बॉक्स चालतील. अन्य एका रिपोर्टमध्ये म्हटले की, Pixel 6 ची किंमत €649 असेल तर Pixel 6 Pro ची किंमत €899 इतकी असणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये Google Pixel 5 ला EUR 629 म्हणजेच ५४ हजार ५०० रुपयात लाँच केले होते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FvX3jQ