नवी दिल्लीः जर तुम्हाला एक नवीन अॅप्पल आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी हीच योग्य संधी आहे. सध्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स वर सुरू असलेल्या सेलमध्ये आयफोन १२ सीरीज आतापर्यंत सर्वात कमी किंमतीत विकली जात आहे. खरं म्हणजे, आयफोन १३ सीरीज आल्यानंतर सीरीजच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली होती. आता ऑनलाइन सेलमध्ये याला आणखी स्वस्त किंमतीत विकले जात आहे. या सीरीजला तुम्ही ३८ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. iPhone 12 आणि 12 Mini वर मिळतोय तगडा डिस्काउंट Flipkart वर Big Billion Days सेल सुरू आहे. या सेल मध्ये अॅप्पल आयफोन १२ मिनी फोनला ३८ हजार ९९९ रुपयात विकले जात आहे. लाँचिंग वेळी या मॉडलची सुरुवातीची किंमत ६९ हजार ९९० रुपये होती. ही एक मोठी सूट आहे. याचप्रमाणे अॅप्पल आयफोन १२ स्मार्टफोन ४९ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. लाँचिंग वेळी आयफोन १२ ची सुरुवातीची किंमत ७९ हजार ९९० रुपये होती. फ्लिपकार्ट आपल्या खरेदीदारांना ICICI bank क्रेडिट कार्ड आणि Axis Bank क्रेडिट कार्डवर १ हजार रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट देत आहे. याप्रमाणे फोनला कमी किंमतीत खरेदी करू शकता. दोन्ही फोन्स तीन स्टोरेज ऑप्शन ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज मध्ये येते. जाणून घ्या फोन्सच्या फीचर्स संबंधी. iPhone 12 आणि 12 Mini चे फीचर्स आयफोन १२ आणि आयफोन १२ मिनी कमी किंमतीत पॉवरफुल डिव्हाइसेस आहे. आयफोन १२ मिनी मध्ये ५.४ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. तर आयफोन १२ मध्ये ६.१ इंचाचा रेटिना XDR स्क्रीन मिळते. दोन्ही फोनमध्ये 12MP + 12MP चे रियर कॅमेरा सिस्टम सोबत जबरदस्त कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोन Apple च्या A14 बायोनिक चिपसेटवर काम करतो. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l6AEBh