नवी दिल्ली : वर सेल जवळपास महिन्याभरापासून सुरू असून, आताही या सेलमध्ये अनेक आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. या सेलमध्ये वर बंपर डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही जर कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रेडमीची ही ऑफर तुमच्यासाठीच आहे. जवळपास २ हजार रुपये डिस्काउंटसह हा फोन खरेदी करू शकता. याशिवाय Axis, IndusInd आणि Citibank च्या बँक ऑफरचा देखील लाभ घेता येईल. वाचा: Amazon सेलमध्ये Note 10S वर बंपर डिस्काउंट Amazon सेलमध्ये Redmi Note 10S वर ४० टक्के डिस्काउंट मिळत आहे. तसेच, बँक ऑफर्सचा देखील लाभ मिळेल. या सर्व डिस्काउंटनंतर फोन फक्त १२,७४९ रुपयात खरेदी करता येईल. Redmi Note 10S स्मार्टफोन मे महिन्यात लाँच झाला होता. त्यावेळी याची किंमत १४,९९९ रुपये होती. Amazon सेलमध्ये यावर १ हजार रुपये डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय Axis, IndusInd और Citibank क्रेडिट/डेबिट कार्ड यूजर्सला डिस्काउंट मिळेल. ईएमआय आणि नॉन-ईएमआयवर १,२५० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. एकूणच, २,२५० रुपयांच्या बचतीनंतर फोनला १२,७४९ रुपयात खरेदी करू शकता. Redmi Note 10S चे फीचर्स: Redmi Note 10S मध्ये ६.४३ इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला असून, याचा पीक ब्राइटनेस ११०० निट्स आहे. यात २.०५GHz MediaTek Helio G९५ चिपसेटसह चिपसेट ARM Mali-G७६ MC४ GPU दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, याचा मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सल आहे. तसेच, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस मिळते. सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Redmi Note 10S स्मार्टफोन अँड्राइड ११ आधारित MIUI १२ वर काम करतो. यात पॉवरसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूष वाय-फाय जीपीएस, IR blaster आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅकचा सपोर्ट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AYqMhV