नवी दिल्ली: प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी Google ने आपला बहुचर्चित स्मार्टफोन जागतिक स्तरावर लाँच केला असून या स्मार्टफोनची डिझाईन आकर्षक आहे. या फोनमध्ये टेन्सर चिपसेट देण्यात आला आहे, जो स्नॅपड्रॅगन 765G चिपपेक्षा ८० टक्के वेगाने काम करतो. यासह युजर्सना Google Pixel 6 स्मार्टफोनमध्ये ५० एमपी कॅमेरा आणि ३० W फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी मिळेल. वाचा: Google Pixel 6ची वैशिष्ट्ये : Google Pixel 6 स्मार्टफोनमध्ये६.४ इंच फुल एचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट ९० Hz आहे. याला IP68 चे रेटिंग मिळाले आहे. याचा अर्थ असा की हे उपकरण पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. या डिव्हाइसमध्ये चांगल्या कामगिरीसाठी, गुगल निर्मित टेन्सर चिपसेट देण्यात आला आहे, जो स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसरपेक्षा ८० टक्के वेगवान आहे. त्याच वेळी, हे डिव्हाइस अँड्रॉइड १२ आउट-ऑफ-द-बॉक्स ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. Google Pixel 6 कॅमेरा : कंपनीने उत्कृष्ट फोटो क्लिक करण्यासाठी Google Pixel 6 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये पहिला ५० MP प्रायमरी सेंसर आणि दुसरा १२ MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. या व्यतिरिक्त, युजर्सना स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ एमपी कॅमेरा मिळेल. या फोनचा कॅमेरा मॅजिक इरेजर आणि अॅक्शन पॅन सारख्या फीचर्सला सपोर्ट करतो. युजर्स याद्वारे 4K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. Google Pixel 6 बॅटरी: Google Pixel 6 स्मार्टफोनमध्ये ४६०० mAh ची बॅटरी आहे. जी, ३० W फास्ट चार्जिंग आणि २३ W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. या व्यतिरिक्त, युजर्सना स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, एनएफसी, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखी वैशिष्ट्ये मिळतील. Google Pixel 6 ची किंमत: Google Pixel 6 स्मार्टफोन ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट आणि ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज प्रकारात उपलब्ध आहे. १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $ ५९९ म्हणजे सुमारे ४५,९०० रुपये आहे. परंतु, त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत अद्याप माहित नाही. त्याचबरोबर हा फोन किंडा कोरल, सॉर्टा सीफोम आणि स्टॉर्मी ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदी केला जाऊ शकतो. Google Pixel 6 भारतात कधी सादर होईल याबद्दल देखील सध्या माहिती नाही. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z4Zbhu