नवी दिल्लीः अँड्रॉयडसाठी व्हाटसअॅप एक प्रोफाइल फोटो प्रायव्हसी सेटिंगची टेस्टिंग करीत आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या फीचर द्वारे युजर आपली प्रोफाइल फोटो कोणत्याही स्पेसिफिक कॉन्टॅक्ट पासून लपवता येवू शकतात. हे कस्टम प्रायव्हसी सेटिंग सध्या अनेक पर्यायासोबत येवू शकते. ज्यात 'Everyone', 'My Contacts' आणि 'Nobody' चा समावेश आहे. नवीन फीचरला वाढत्या प्रायव्हसी सेटिंग्सचा एक भाग म्हटले जात आहे. जे व्हाट्सअॅप वर लास्ट सीन आणि अबाउट स्टेट्स अपडेटचा भाग असेल. असे काम करणार नवीन फीचर रिपोर्टच्या माहितीनुसार, व्हाट्सअॅप बीटा ट्रॅकर WABetaInfo ने नोट केले आहे. अँड्रॉयड बीटा व्हर्जन 2.21.21.2 साठी व्हाट्सअॅप मध्ये नवीन प्रोफाइल फोटो प्रायव्हसी सेटिंग संबंधी हिंट देण्यात आली आहे. सोर्सकडून शेअर करण्यात आलेल्या एका स्क्रीनशॉटवरून उघड झाले की, नवीन सेटिंग My contacts except...च्या माध्यमातून येणार आहे. नवीन सेटिंग तुम्हाला त्या खास संपर्काची निवड करता येणार आहे. ज्या लोकांना तुमच्या प्रोफाइल पासून दूर ठेवायचे आहे. My contacts except… पर्यायाचा प्रोफाइल फोटो प्रायव्हसी सेटिंग पर्यंत सीमित असण्याची शक्यता नाही तर लास्ट सीन आणि अबाउट स्टेट्स अपडेटसाठी उपलब्ध होईल. यासंबंधी आधीच WABetaInfo कडून रिपोर्ट करण्यात आले होते. सध्या हे स्पष्ट नाही की, हा बदल सुरुवातीला फक्त अँड्रॉयड पर्यंत मर्यादीत राहिल. परंतु, WABetaInfo ने आधीच एक iPhone स्क्रीनशॉट दाखवला होता. ज्यात लास्ट सीन पर्याय समान कस्टम प्रायव्हसी सेटिंगचा सल्ला दिला होता. आधीही आणले आहे असे फीचर २०१७ मध्ये व्हाट्सअॅपने आपल्या स्टेट्स फंक्शनसाठी My contacts except… पर्याय आणला आहे. या पर्यायानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये ग्रुप प्रायव्हसी सेटिंग्ससाठी आणले आहे. परंतु, अपडेटला नुकतेच अँड्रॉयड बीटा रिलीजसाठी व्हाट्सअॅपच्या आत पाहिले गेले आहे. आतापर्यंत बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध नाही आहे. हेही स्पष्ट नाही की, व्हाट्सअॅप नवीन सिस्टम प्रायव्हसी सेटिंगला किती टप्प्यात रोलआउट करणार आहे. आधी प्रोफाइल फोटोसाठी येईल. नंतर लास्ट सीन आणि स्टेट्स अपडेट संबंधी माहिती मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DfR00P