Full Width(True/False)

मराठमोळ्या सुप्रिया पाठारे घासायच्या दुसऱ्यांच्या घरातली भांडी, आज...

मुंबई- '' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मराठमोळ्या अभिनेत्री आज प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या आहेत. आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून सुप्रिया यांनी त्यांचं उत्कृष्ट अभिनयकौशल्य सिद्ध केलं आहे. प्रत्येक भूमिकेत चपखल बसणाऱ्या सुप्रिया प्रत्येक गृहिणीच्या ओळखीच्या झाल्या आहेत. सुप्रिया यांनी आजवर विनोदी, गंभीर, नकारात्मक अशा अनेक भूमिका साकारल्या. आता एका सोज्वळ आईच्या रूपात त्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. मात्र त्यांचा इथवरचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. चार भावंडात मोठ्या असल्याने सुप्रिया घरात मदत व्हावी म्हणून रस्त्यावर अंडी, चणे विकायला जायच्या. तर कधी दुधाच्या बाटल्या घरोघरी नेऊन पोहोचवायच्या. या सोबतच शाळेचा अभ्यासही करायच्या. लोकप्रिय अभिनेत्री अर्चना नेवरेकर या सुप्रिया यांच्या छोट्या बहीण. त्यांना अभिनयाची आवड असल्याने अर्चना नाटकात सहभागी व्हायच्या आणि अर्चनाला सोबत म्हणून सुप्रिया त्यांच्याबरोबर जायच्या. त्याचे अर्चना सुप्रिया यांना १०० रुपये द्यायच्या. सुप्रिया यांना नृत्याची फार आवड पण घरची परिस्थिती तशी नसल्याने सुप्रिया यांनी काम करायचं ठरवलं. अर्चना पालेकर यांच्याकडे भरतनाट्यम शिकण्यासाठी सुप्रिया यांनी त्यांच्या मैत्रिणीकडे भांडी घासायचं काम सुरू केलं. त्याचे त्यांना १०० रुपये मिळायचे. क्लासचे ७० रुपये भरून उरलेले ३० रुपये सुप्रिया आईला द्यायच्या. सुप्रिया आणि त्यांची आई तेव्हा १८ घरांची भांडी घासायच्या. एवढं काम करूनदेखील सुप्रिया भरतनाट्यम शिकण्यासाठी धडपड करायच्या. शाळेत बाईंची नक्कल करत असताना दुसऱ्या बाईंनी पाहिलं आणि सुप्रिया यांना नाटकात काम करण्याची संधी दिली. त्यानंतर सुप्रिया यांनी अभिनयाकडे लक्ष केंद्रित केलं. पुढे सुप्रिया यांनी अनेक नावाजलेल्या कलाकारांसोबत काम केलं. 'फु बाई फु', 'जागो मोहन प्यारे', 'मोलकरीणबाई', 'श्रीमंताघरची सून', 'चि. व चि. सौ कां', 'बाळकडू' अशा चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाले. मग सहनायिका असो वा नकारात्मक भूमिका असो किंवा 'फु बाई फु' सारख्या विनोदी भूमिका त्यांनी सहजतेने साकारलेल्या पाहायला मिळाल्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3H2F1qe