Full Width(True/False)

प्रसिद्ध गायिका मारिलिया मेंडोंकाचा विमान अपघातात मृत्यू

मुंबई: ब्राझीलमधील सर्वात लोकप्रीय गायिका पैकी एक असलेली मारिलिया मेंडोंका हीचा २६ व्या वर्षी विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार या दुर्घटनेत तिच्या सोबत तिचे काका,निर्माते आणि दोन ड्रायव्हर होते जे तिच्याच सोबत ब्राझील मधील दक्षिण पूर्व मिनास प्रांतातील ग्रामीण भागात दुर्घटनेत निधन झालेले आहे. ब्राझील सरकारने दुर्घटनेचा तपास करण्याचा आदेश दिला आहे. मेंडोंका हि महिलाच्या अनुभवावर आधारित आणि अपूर्ण नात्यांवर गायन करत असत.त्यामुळे ती ब्राझील मध्ये खूप लोकप्रिय झाली होती.२०१९ साली ग्रॅमी अवॉर्ड मध्ये तिचा शो खुप लोकप्रिय ठरला होता. मेंडोंकाने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती.सुरुवातीला ती ब्राझिलियीन देशी संगीताचे गायन करत होती. त्यानंतर २०१६ साली ती विदेशात देशी संगीतामुळे लोकप्रिय झाली होती.ज्यामुळे तिची दुःखाची राणी ही नवीन ओळख देशात तयार झाली होती. करोना आपत्तीमुळे मागच्या वर्षी तिचे सर्व लाईव्ह कार्यक्रम रद्द झाले होते. त्यानंतर तिने आपले शो ऑनलाईन पद्धतीने सुरु केले होते.ज्यात तिने जागतिक रेकॉर्ड बनवले होते.तिच्या एका लाईव्ह कार्यक्रमाला ३.३ मिलियन प्रेक्षक बघत होते जो की आतापर्यंतचा युट्यूबवरील सर्वात जास्त लोकप्रिय शो ठरला होता.२०२० साली तिचे स्पोटीफाई वर सर्वात जास्त गाणे लोकप्रिय ठरली होते. मेंडोंकाला दोन वर्षाचा मुलगा आहे जो दुर्घटनेपासून १२ किलोमीटर लांब कैरेटिंगा शहर मध्ये शुक्रवारी रात्रीच्या कार्यक्रमासाठी संगीत सादरीकरणासाठी तयार होता. मेंडोंकाने दुर्घटनेपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात ती विमानमध्ये बसण्याची तयारी करताना दिसत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qdMSep