मुंबई- चाहते आपल्याला आवडणाऱ्या कलाकाराच्या एका भेटीसाठी काहीही करायला तयार होतात. कलाकारही अतिशय विनम्रपणे आपल्या चाहत्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्यासोबत फोटो काढताना दिसतात. मात्र हल्ली कलाकारांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये देखील आता वाढ होताना दिसतेय. यापूर्वी 'आश्रम ३' च्या सेटवर बजरंग दलाच्या समर्थकांनी हल्ला केला होता. आता पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने चाहतेही चकित झाले आहेत. मंगळवारी लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता याच्यावर एका अज्ञात इसमाने हल्ला केला. बंगळुरू विमानतळावर घडलेल्या या घटनेचं सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. लोकप्रिय मराठी निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये विजय विमानतळावरून जात असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचं दिसतंय. विजय त्याच्या सहकाऱ्यांसोबत विमानतळावरून जात आहे. विजयच्यासोबत त्याचे सुरक्षा रक्षक आणि काही मित्रमंडळी होती. पुढे जाणाऱ्या विजयवर एक इसम मागून धावत येऊन हल्ला करतो. मात्र विजयच्या मित्राने त्याला आधीच पाहिल्याने त्या इसमाला रोखलं जातं. या घटनेत विजयला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. त्या इसमाने हल्ला का केला, त्याचा हेतू काय, याबद्दलची माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, विजयने त्या इसमाविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. हा संपूर्ण व्हिडीओ शेअर करत टिळेकर यांनी कलाकारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. आता विमानतळही सुरक्षित नाही का? असा प्रश्न टिळेकर यांनी विचारला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EKQEQE