मुंबई- दिवाळी म्हटली की रांगोळी, फराळ आणि कंदील आले. परंतु, त्यासोबतच महत्वाचे असतात फटाके. फटाके वाजल्याशिवाय दिवाळीचा आनंद अपुराच असतो. परंतु, दिवाळी येताच पर्यावरणातील प्रदूषणावर चर्चा होऊ लागतात. या वर्षी प्रदूषणाचा वाढता आलेख बघता दिल्लीमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घातली गेली आहे. परंतु, अभिनेत्री कंगना रणौत हिने या निर्णयाला विरोध केला आहे. ज्यांना पर्यावरणाची एवढी काळजी आहे त्यांनी दिवाळीचे तीन दिवस गाड्या चालवू नका, असं म्हणत तिने रोष व्यक्त केला आहे. असं असलं तरी असेही काही बॉलिवूड कलाकार आहेत ज्यांनी यापूर्वी दिवाळीमध्ये फटाके न फोडण्याचं आवाहन केलं होतं. या कलाकारांना चाहत्यांनी अक्षरशः केराची टोपली दाखवली होती. फटाके न फोडण्याचं आवाहन केलेल्या कलाकारांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. पाहूया असे काही बॉलिवूड कलाकार. १. फटके न फोडण्याचा सल्ला दिल्याबद्दल आलिया भट्ट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. एका युझरने लिहिलं होतं, 'हे तेच लोक आहेत जे नवीन वर्षाला भरभरून फटाके फोडतात.' २. लोकप्रिय अभिनेता आमिर खान याने एका जाहिरातीमधून फटाके न फोडण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ट्रोलर्सनी आमिरला प्रचंड ट्रोल केलं होतं. एका युझरने लिहिलेलं, 'तुमचं सगळं ज्ञान हिंदू सणांना बाहेर पडतं. ३. अजय देवगण लोकप्रिय अभिनेता अजय देवगण यानेही फटाक्याशिवाय दिवाळी साजरी करण्याचं समर्थन केलं होतं. फटाक्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला योग्य ठरवत अजय म्हणाला होता, 'याने दुकानदारांचं नुकसान होईल पण आपल्या भविष्यासाठी हा निर्णय योग्य आहे.' ४. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर प्रियांकाने तिच्या लग्नात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले होते. त्यानंतर प्रियांकाला नेटकऱ्यांनी प्रचंड सुनावलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3q2Pg7K