Full Width(True/False)

शानदार फीचर्स आणि दमदार बॅटरी लाइफसह Redmi ची नवीन स्मार्टवॉच आणि स्मार्ट बँड लाँच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : आणि लाँच झाली आहे. हे लेटेस्ट बँड मोठा डिस्प्ले, १४ दिवसांची बॅटरी लाइफ आणि ११० पेक्षा अधिक वर्कआउट्ससह येते. तर नवीन रेडमी वॉच २ चे स्वस्त व्हर्जन आहे. यात १०० पेक्षा अधिक फिटनेस मोड्स आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटर सारखे फीचर्स मिळतात. वाचा: Smart Band Pro चे फीचर्स स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर या बँडमध्ये १.४७ इंच (१९४x३६८ पिक्सल) एमोलेड डिस्प्ले दिला असून, याची पिक्सल डेंसिटी २८२ पिक्सल प्रती इंच आणि पीक ब्राइटनेस ४५० निट्स आहे. या बँडमध्ये २०० एमएएच बॅटरी दिली असून, ही बॅटरी १४ दिवस टिकते. तर पॉवर सेव्हिंग मोडमध्ये २० दिवस टिकेल. बँडमध्ये ६ एक्सिस सेंसर, लाइट सेंसर आणि पीपीजी हार्ट रेट सेंसर दिले आहे. याशिवाय ब्लूटूथ व्हर्जन ५, ५ एटीएम सर्टिफाइड आणि Apollo ३.५ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. बँड अँड्राइड ६.० आणि आओएस १०.० वरील व्हर्जनला सपोर्ट करते. बँडचे वजन १५ ग्रॅम असून, यात ११० पेक्षा अधिक वर्कआउट मोड्स आहेत. या बँडमध्ये ब्लड ऑक्सिजम मॉनिटरिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग आणि स्लीप क्वालिटी ट्रॅकिंगसारखे फीचर्स मिळतात. यात ट्रेडमिल, आउटडोर रनिंग, आउटडोर सायकलिंग, आउटडोर वॉकिंग सारखे वर्कआउट मोड्स मिळतात. बँड ट्रेडमिल, आउटडोर रमिंग आणि आउटडोर वॉरिंग हे तीन फिटनेस मोड्स आपोआप डिटेक्ट करतो. Redmi Watch 2 Lite चे फीचर्स रेडमीच्या या स्मार्टवॉचमध्ये १.५५ इंच (३२०x३६० पिक्सल) टीएफटी डिस्प्ले, १०० पेक्षा अधिक वर्कआउट मोड्स आणि १०० पेक्षा जास्त वॉच फेस दिले आहेत. ५ ATM वॉटर रेसिस्टेंटसह येणाऱ्या या वॉचमध्ये इन-बिल्ट जीपीएस, स्लीप मॉनिटरिंग, स्ट्रेस मॉनिटरिंग, २४ तास हार्ट रेट मॉनिटरिंग सारखे फीचर्स मिळतात. Redmi Watch 2 Lite ची बॅटरी १० दिवस टिकते. तर जीपीएस स्पोर्ट्स मोडवर १४ दिवस टिकेल. यात मॅग्नेटिक चार्जिंग पोर्टसह २६२ एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. वॉचमध्ये वेदर म्यूझिक कंट्रोल, मेसेज नॉटिफिकेशन आणि फाइंड माय फोन सारखे कामाचे फीचर्स दिले आहेत. यात ब्लूटूथ व्हर्जन ५ दिले असून, वॉच अँड्राइड ६ आणि आयओएस १०.० वरील व्हर्जनला सपोर्ट करते. कंपनीने Redmi Smart Band Pro Price आणि Redmi Watch 2 Lite Price च्या किंमतीचा खुलासा केला नाही. बँड ब्लॅक, तर वॉच ब्लू, ब्लॅक आणि आयव्हरी, ऑलिव्ह आणि पिंक रंगात येते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CDf2CX