Full Width(True/False)

इंटरनेटशिवाय सहज UPI द्वारे करू शकता पेमेंट, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : अर्थात चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डिजिटल ट्रांजॅक्शनसाठी याला डिझाइन करण्यात आले असून, याद्वारे पैसे सेंड अथवा रिसिव्ह करू शकता. खास गोष्ट म्हणजे याचा वापर तुम्ही विना इंटरनेट करू शकता. वाचा: तुम्हाला विना इंटरनेट ट्रांजॅक्शन करण्यासाठी BHIM अ‍ॅपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही याचा वापर करू शकता. BHIM अ‍ॅपवर यूपीआय ट्रांजॅक्शनसाठी रजिस्टर्ड नंबरवरूनच विना इंटरनेट यूपीआय पेमेंट करता येईल. यासाठी तुम्हाला फोनमध्ये USSD कोड *99# डायल करावा लागेल. त्यानंतर कॉलच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमचा फोन एक पॉप-अप मेन्यू दाखवेल. यात तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. यात तुम्हाला बॅलेंस चेक करण्यापासून ते UPI PIN मॅनेजचा पर्याय मिळेल. पैसे पाठविण्यासाठी तुम्हाला सेंड मनी या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीची माहिती द्यावी लागेल. यासाठी तुम्ही यूपीआय आयडीसह बँक अकाउंट डिटेल्स देखील वापरू शकता. डिटेल्स भरल्यानंतर जी रक्कम पाठवायची आहे ती निवडा. आता सेंडवर क्लिक करा. पुढील स्टेपमध्ये तुम्हाला रिमार्क विचारेल. तुम्ही १ प्रेस करून हे स्किप करू शकता. आता तुम्हाला UPI PIN टाकावा लागेल. या पिननंतर पैसे ट्रांसफर होतील. येथे तुम्हाला BHIM अ‍ॅपचा रजिस्टर्ड पिनच वापरायचा आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qhGrak