नवी दिल्ली : महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी असलेल्या आणि पॅन कार्डला लिंक करणे अनिवार्य आहे. सर्व नागरिकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत आधार कार्ड आणि लिंक करावे लागणार आहे. असे न केल्यास १ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आयकर कायद्यांतर्गत हे नियम करण्यात आले आहे. वाचा: आधार आणि पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर होती. मात्र ही मुदत वाढवण्यात आली आहे. तुम्ही जर आधार-पॅन लिंक न केल्यास दंड होण्यासोबतच पॅन कार्ड इनवॅलिड होईल. त्यामुळे तुम्हाला त्वरित आधार-पॅन लिंक करणे गरजेचे आहे. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन लिंक करू शकता. असे लिंक करू शकता आधार आणि पॅन कार्ड
  • सर्वात प्रथम आयकर विभागाची अधिकृत वेबसाइट incometax.gov.in/ke/foportal वर जा.
  • येथे तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला आधार आणि पॅन कार्डची माहिती विचारली जाईल.
  • येथे संपूर्ण माहिती भरा.
  • जर तुमचे आधार आणि पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला your PAN is linked to aadhaar number असा मेसेज दिसेल.
  • अन्यथा incometaxindiafiling.gov.in वर जा.
  • मागितलेली माहिती भरल्यानंतर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक होईल.
मेसेजद्वारे असे लिंक करा आधार-पॅन कार्ड
  • जर तुमच्याकडे कॉम्प्यूटर अथवा स्मार्टफोन नसल्यास तुम्ही एसएमएसद्वारे देखील लिंक करू शकता.
  • यासाठी तुम्हाला UIDPAN<१२ आकडी आधार नंबर – १० आकडी पॅन नंबर टाइप करून ५६७६७८ अथवा ५६१५६१ वर मेसेज पाठवावा लागेल.
  • मेसेज पाठवल्यानंतर आधार-पॅन लिंक झाल्याची माहिती मोबाइलवर मिळेल.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3osOAY8