Full Width(True/False)

Best Camera Phone: फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन शोधताय? १०८MP कॅमेऱ्यासह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट पर्याय, पाहा डिटेल्स

तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल व यासाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात एकापेक्षा एक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. आपण स्मार्टफोन खरेदी करताना सर्वात प्रथम ज्या गोष्टी पाहतो त्यापैकी एक म्हणजे कॅमेरा सेंसर. फोनमध्ये शानदार कॅमेरा असणे गरजेचे आहे. सध्या बाजारात ४८ मेगापिक्सलपासून ते १०८ मेगापिक्सल सेंसरसह येणारे फोन उपलब्ध आहेत. फोनमध्ये रियरला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, क्वाड रियर कॅमेरा सेटअपचा पर्याय मिळतो. तुम्ही जर कमी बजेटमध्ये १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणारे फोन खरेदी करण्याचा विचार असाल, तर आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टफोनची माहिती देत आहोत. २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये १०८ मेगापिक्सलसह Mi 10i, Realme 8 Pro, MOTOROLA G60 आणि Redmi Note 10 Pro Max हे स्मार्टफोन्स येतात. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Mi 10i
Mi 10i

Mi 10i स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंच शानदार डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये हायब्रिड सिम स्लॉट दिले आहे. फोन ४जी नेटवर्क कनेक्टिव्हिटीसह येतो. पॉवरसाठी यामध्ये ४८२० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. Mi 10i स्मार्टफोनला तुम्ही फ्लिपकार्टवरून २२,७५० रुपयात खरेदी करू शकता. ऑफरनंतर हा फोन अजून कमी किंमतीत उपलब्ध होईल.

Realme 8 Pro
Realme 8 Pro

Realme 8 Pro स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅमसह १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. पॉवरसाठी यामध्ये ४५०० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. रियलमीच्या फोनमध्ये ६.४ इंच डिस्प्ले दिला असून, फोन ड्यूल सिम सपोर्टसह येतो. याचे सर्वात खास वैशिष्ट्यं म्हणजे यात रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा मुख्य कॅमेरा १०८ मेगापिक्सल आहे. सोबत ८ + २ +२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनची किंमत १७,९९९ रुपये आहे.

MOTOROLA G60
MOTOROLA G60

MOTOROLA G60 स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. फोनमध्ये ६.७८ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी याच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. याचा प्रायमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सल सेंसर आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये पॉवरसाठी ६००० एमएएचची बॅटरी मिळते. MOTOROLA G60 स्मार्टफोनला तुम्ही फ्लिपकार्टवरून १८,१९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

Redmi Note 10 Pro Max
Redmi Note 10 Pro Max

रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज दिला आहे. यात रियरला १०८ + ८ + २ + ५ मेगापिक्सल आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर पॉवरसाठी यात ५०२० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ६.६७ इंच डिस्प्ले, ड्यूल सिम आणि ४जी कनेक्टिव्हिटी मिळते. अ‍ॅमेझॉनवर हा फोन १९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनवर १४,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि अमेरिकन एक्सप्रेस कार्डद्वारे खरेदी केल्यास १,५०० रुपये अतिरिक्त सूट मिळेल.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rWhKB9