Full Width(True/False)

काय होतीस तू काय झालीस; मराठी सिनेसृष्टीतील या अभिनेत्रीला ओळखलंत का?

मुंबई: टीव्ही किंवा चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचे ग्लॅमरस फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. पण चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी ते कसे दिसायचे याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. अनेक कलाकारांचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो व्हायरल होताना दिसतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा फोटो पाहून मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रीला ओळखणंही कठिण असल्याचं अनेकांनी म्हटलं. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो आहे अभिनेत्री हिचा. मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश हता. पण तिचा हा फोटो पाहून तिच्यात झालेला बदल पाहून अनेकांनी आश्चर्य वाटल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत रुपाली भोसले अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करतेय. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे. सुमित राघवन यांच्यासोबत 'बडी दूर से आये है' ही तिची मालिका प्रचंड गाजली होती.रुपाली 'एका पेक्षा एक' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. 'मन उधाण वाऱ्याचे', 'कन्यादान' अशा अनेक मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे. सध्या ती 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे. बिग बॉसमध्ये आल्यानंतर रुपाली आणि पराग यांच्या नात्याची खूप चर्चा झाली. मात्र, रुपालीनं माझं आणि परागचं नात फक्त मैत्रीचं असल्याचं स्पष्ट केलं होतं. सध्या ती अंकित मगरेसोबत रिलेशनशीपमध्ये असून दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. पहिल्या लग्नानंतर रुपाली लंडनमध्ये स्थायिक झाली होती. मात्र काही कारणास्तव तिनं घटस्फोटाचा निर्णय घेतला. तेव्हापासून ती तिच्या आई आणि भावासोबत राहते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3g5jx0f