मुंबई : छोट्या पडद्यावरील '' हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे जसे सर्वसामान्य प्रेक्षक चाहते आहेत तसेच अनेक मान्यवर मंडळी देखील चाहते आहे. या कार्यक्रमातील सर्व कलाकार जे स्किट सादर करतात त्यामुळे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होत असते. या कार्यक्रमातून समीर चौघुले, आणि इतर कलाकार करत असलेल्या मनोरंजनाबद्दल साक्षात गानसाम्राज्ञी भारतरत्न यांनी या सर्वांचे भरभरून कौतुक केले आहे. इतकेच नाही तर लतादीदींनी यांना भेटवस्तू आणि पत्र पाठवून कौतुकाची शाबासकी दिली आहे. लतादीदींनी पाठवलेली भेटवस्तू आणि पत्र यामुळे समीर भारावून गेले आहेत. त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केल्या आहेत. काय लिहिले आहे पोस्टमध्ये समीर चौघुले यांनी लतादीदींनी त्यांना पाठवलेले स्व-हस्ताक्षरात पाठवलेले पत्र आणि भेटवस्तू यांचा फोटो शेअर केला आहे. हे फोटो शेअर करताना समीर यांनी लिहिले आहे की, 'निसर्ग किती ग्रेट आहे न !शब्द संपले की भावनांना वाट मिळावी म्हणून त्याने अश्रूंची निर्मिती केली...आज ते प्रकर्षाने जाणवले...आज सुरांची आणि स्वरांची सरस्वती आदरणीय लता मंगेशकर दीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली. आणि ती ट्रॉफी म्हणजे दीदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद....थिजून जाणे म्हणजे काय ते आज मला कळले...लतादीदी महाराष्ट्राची हास्यजत्रा नेहेमी बघतात आणि खूप हसतात....एन्जॉय करतात ही आम्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा कुटुंबियांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. हा सुवर्ण क्षण आयुष्यात आला तो फक्त आणि फक्त आमच्या हास्यजत्रा कुटुंबामुळे... ' या पोस्टमध्ये समीर यांनी सोनी मराठी वाहिनीचे प्रमुख अजय भालवणकर, नॉन फिक्शन प्रमुख अमित फाळके, ईपी गणेश सागडे, सिद्धुगुरू जुवेकर यांच्यासह सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे यांचाही आवर्जून उल्लेख केला आहे. या सर्वांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचेही समीर यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे. विशाखा सुभेदार यांचे मानले खास आभार समीर चौघुले यांनी लिहिलेल्या या पोस्टमध्ये कार्यक्रमातील त्यांची जोडीदार विशाखा सुभेदार यांचेही खास उल्लेख करत आभार मानले आहेत. समीर यांनी लिहिले आहे की, ' ...आणि खास आभार माझी पार्टनर विशाखा सुभेदार... विशू आपल्या जोडीच्या यशात तुझा खूप मोठा वाटा आहे...तुझ्या शिवाय मी अपूर्ण आहे... विशाखा सुभेदार मनापासून आभार...' या पोस्टच्या शेवटी समीर यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमचेही पुन्हा एकदा आभार मानले आहेत. त्यामध्ये अमीर हडकर, दिग्दर्शन टीम, प्रोडक्शन टीम, पडद्या मागचे कलाकार यांच्यासह मयुरेश पै, प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचेही खास आभार मानले आहे. समीरसमोर झुकले होते बिग बी! काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाची संपूर्ण टीमने 'कौन बनेगा करोडपती १३' च्या सेटवर जाऊन महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती. त्यावेळी अमिताभ यांनी हा कार्यक्रम आवर्जून पहात असल्याचे सांगितले होते. त्यावेळी समीर चौघुले हे अमिताभ बच्चन यांच्याशी बोलायला गेले. तेव्हा समीर बिग बींना म्हणाले की मला तुमच्या पाया पडायचे आहे. 'तुम्ही नका माझ्या पाया पडू. उलट मीच तुमच्या पडतो.' असे अमिताभ म्हणत ते खाली झुकले होते... या क्षणाचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Er8PuN