मुंबई : याचा '' हा सिनेमा येत्या २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. दोन वर्षांपासून हा सिनेमा प्रदर्शित होण्याची चाहत वाट बघत आहेत. आता त्यांची ही प्रतीक्ष संपली. १२५ कोटी खर्चून निर्मिती झालेल्या या सिनेमासाठी रणवीर सिंगने २० कोटी रुपये मानधन घेतले आहे. इतकेच नाही तर सिनेमाच्या नफ्यातील काही भागही तो मानधन म्हणून घेणार आहे. तर यांनी देखील या सिनेमासाठी मोठे मानधन घेतल्याची चर्चा आहे. हे करण्यामागे काही कारण असल्याचं समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स एण्टरटेनमेन्टनने विजेत्या संघावर १५ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामधले ५ कोटी रुपये कपिल देव यांना देण्यात आले आहेत. ज्या विषयावर हा सिनेमा तयार करण्यात आला, त्यामध्ये ज्या व्यक्तिरेखा दाखवण्यात आल्या आहेत. त्याचे सर्व अधिकार घेण्यासाठी म्हणून ही रक्कम कपिल यांना देण्यात आली. या सिनेमामध्ये वास्तवात घडलेल्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचे अधिकार घेणं आवश्यक होतं. या सर्व गोष्टी लक्षात ठेवूनच निर्मात्यांनी १९९३ मध्ये विश्व कप जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंना सुमारे १५ कोटी रुपये दिले आहेत. त्यामध्ये एक तृतियांश रक्कम कपिल देव यांना देण्यात आली आहे. उर्वरीत १० कोटी रुपये प्रत्येक खेळाडूच्या मागणीनुसार त्यांना दिले गेले. दरम्यान, या सिनेमासाठी कपिल देव यांनीदेखील खूप मेहनत घेतली. त्यांनी रणवीरला ट्रेनिंग दिलं. त्यांनी मैदानावर जाऊन रणवीरला त्यांची गोलंदाजीची शैली कशी होती, ते फलंदाजी कशी करायचे याचं प्रशिक्षण दिलं. त्यानुसार रणवीरने या सिनेमात कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. कबीर खान यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला '८३' सिनेमा १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेवर आधारित आहे. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका पादुकोण कपिल यांची पत्नी रोमी भाटिया ही भूमिका साकारत आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी, ताहीर राज भसीन, साकिब सलीम, जतिन सर्ना, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, दिनकर शर्मा, निशांत दहिया आणि हार्डी संधू हे देखील आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3egy9s3