मुंबई: '' या मालिकेत शुभ्रा आणि सोहम यांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती. शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री आणि सोहम अर्थात म्हणजे अभिनेता यांच्या पडद्यामागच्या मैत्रिचीही जोरात चर्चा सुरू आहे. मालिका बंद झाल्यानंतरही दोघांमधील संपली नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. तेजश्रीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमुळं या दोघांच्या खास नात्याची पुन्हा चर्चा होत आहे. आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त तेजश्रीनं ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तेजश्रीनं आशुतोषचा उल्लेख पार्टनर म्हणून केला आहे. तेजश्रीनं शेअर केलेल्या या फोटोवर दोघांच्याही चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. दरम्यान, तेजश्रीच्या चाहत्यांना तिच्या लग्नाविषयी उत्सुकता आहे. त्यावर ती काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती की, 'मला खरंच लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायला आवडेल. मला खरंच कोणी मुलगा मनापासून आवडला तर मी कसलीही वाट न बघता पुढच्या सहा महिन्यातदेखील लग्न करून सेटल होईन.' जोडीदार कसा हवा याविषयी तेजश्री म्हणली, 'समजुतदार आणि तितकाच जबाबदार असा जोडीदार मला हवा आहे. तो सिनेसृष्टीतला असला तरीही चालेल. पण त्याने मला समजून घ्यावं आणि पाठिंबा द्यावा. पण त्यानं मला लग्नासाठी विचारावं अशी माझी फँटसी आहे.' तेजश्रीला पुन्हा नव्या मालिकेत काम करायला नक्कीच आवडेल. पण सध्याच्या परिस्थितीमुळे तिनं काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Jg9RfO