मुंबई- छोट्या पडद्यावरील मालिका या गृहिणींच्या अतिशय जवळच्या असतात. मालिका म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. फक्त महिलाचं नाही तर पुरुष आणि तरुणवर्गही मालिका पाहण्यासाठी उत्सुक असतो. आज चुकलेला भाग दुसऱ्या दिवशी रिपीट टेलिकास्टवर पाहिला जातो. किंवा वेगवेगळ्या अँपच्या मदतीने उरलेले एपिसोड पूर्ण केले जातात. काही मालिका प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतात. तर काही ,मालिका सहज विस्मरणात जातात. असं असलं तरीही, प्रेक्षकांच्या कधीही विस्मरणात न गेलेल्या मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. २०२१ मध्ये अशाच काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. गूगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या मालिकांच्या यादीत खालील मालिकांनी स्थान पटकावलं आहे. १. ' ' 'बिग बॉस' चा कोणताही सीजन असो तो हिट होणार याची खात्री असते. बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या घडामोडी पाहायला प्रेक्षक उत्सुक असतात. त्यात महेश मांजरेकर यांचं सुत्रसंचालन प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. त्यामुळेच गूगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या मालिकांच्या यादीत 'बिग बॉस मराठी' चा समावेश आहे. २. ' ' घराघरातील गृहिणीची व्यथा मांडणारी मालिका 'आई कुठे काय करते' या वर्षातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या मालिकांच्या यादीत आहे. आपला संसार काटेकोरपणे आणि प्रेमाने सांभाळणारी अरुंधती प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यातही या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ३. ' ' एका सत्य घटनेवर आधारित मालिका 'देवमाणूस' ची फॅन फॉलोविंग तगडी आहे. 'देवमाणूस' ने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले. 'देवमाणूस' मालिकेतील कलाकार आणि कथा दोघांनाही प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. आता या मालिकेचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ४. ' ' परदेशात शिकून आलेला जयदीप नाईलाजाने गौरीसोबत लग्न करतो. मात्र गौरी आपल्या वागण्याने जयदीपचं मन जिंकते. एका अनाथ मुलीची साधीसरळ गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भावली. त्यामुळेच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचा सर्वाधिक शोधल्या गेलेल्या मालिकांच्या यादीत समावेश होतो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DyC8dD