मुंबई : टीव्हीवरील मनोरंजन विश्व असो वा बॉलिवूड.सध्या सर्वच ठिकाणी लग्नसराईचा मौसम सुरू झाला आहे. एकीकडे राजकुमार राव, सारखे कलाकारांचे लग्न झाले आहे. तर दुसरीकडे काही अशा जोड्या आहेत त्यांची लग्नाच्या मांडवाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली विकी आणि कतरीना या जोडीच्या लग्नाच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लवकरच बोहल्यावर उभे राहणार आहेत. अंकिता आणि विकीच्या घरी लग्नाआधी होणा-या विधींना सुरुवात झाली आहे. हे दोघेजण कोणत्या दिवशी लग्न करणार आहेत, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र त्यांचे चाहते या दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत. लग्नाआधी होणा-या काही विधींचे फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत. आता अंकिता आणि विकीच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोघांची लग्नपत्रिका अतिशय खास आहे... अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्याच्या आमंत्रण पत्रिका निमंत्रितांपर्यंत पोहोचल्या आहेत. अभिनेत्री श्रद्धा आर्याला देखील मिळाली आहे. ही लग्नपत्रिका मिळाल्यानंतर श्रद्धाला ती सोशल मीडियावर शेअर करण्याचा मोह आवरता आला नाही. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही लग्नपत्रिका शेअर केली आहे. रॉयल ब्ल्यू रंगाच्या लग्नपत्रिकेवर आमंत्रित व्यक्तीचे नाव लिहिले आहे. ही पत्रिका उघडल्यावर आतमध्ये सोनेरी अक्षरामध्ये वधू-वरांची नावे लिहिली आहेत. त्याशिवाय कार्डामध्ये काही मंत्र लिहिले आहे. मात्र या पत्रिकेमध्ये या दोघांचे लग्न कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला होणार आहे याचा उल्लेखच केलेला नाही. तिथे केवळ डिसेंबर २०२१ इतकेच नमूद केले आहे... ही लग्न पत्रिका शेअर करत श्रद्धाने लिहिले आहे की, 'आता माझ्या सर्वात आवडत्या मुलीची वेळ आली आहे... अंकिता लोखंडे आणि तुम्हा दोघांना खूप सा-या शुभेच्छा...' अंकिता आणि विकीची लग्नपत्रिका अतिशय सुंदर असून अनेक चाहत्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक चाहत्यांनी नवदाम्पत्यास शुभेच्छाही दिल्या आहेत. विकी आणि अंकिताच्या लग्नाआधी काही धार्मिक विधी झाले. हे विधी महाराष्ट्रीयन पद्धीने झाले. त्या विधींचे फोटो अंकिता आणि विकीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिता आणि विकीने कपाळावर मोत्यांच्या मुंडावळ्या बांधल्या आहेत. तर अंकिताने हातामध्ये हिरवा चुडा भरला असून हिरव्या रंगाची साडी तिने नेसली आहे. तर विकीनेही क्रीम कलरचा कुर्ता पायजमा घातला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ECgOVK