Full Width(True/False)

सुगंधा आणि संकेत भोसलेनं उडवली कतरिना- विकीची खिल्ली, म्हणाले...

मुंबई : कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि तिचा नवरा हे सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहेत. हे दोघे मिळून मजेशीर व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांचे हे व्हिडिओ युझर्समध्ये खूपच लोकप्रिय आहेत. अलिकडेच सुगंधाने एक व्हिडिओ करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये तिने आणि संकेतने मिळून कतरिना कैफ आणि यांची त्यांच्या लग्नाच्या बातम्यांवरून चांगलीच थट्टा केली आहे. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. काय आहे व्हिडिओत सुगंधाने शेअर केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच ती संकेतला विचारते की, तू विकी आणि कतरिनाच्या लग्नाला जाणार आहेस का? त्यावर संकेत तिला नाही असे उत्तर देतो. सुगंधा त्याला न जाण्यामागचे कारण विचारते. त्यावर संकेत तिला सांगतो की आपल्याला लग्नाला बोलावले नाही तर का जायचे. त्यावर सुगंधा म्हणते बरोबर आहे तुझे. आपल्या लग्नाला तरी त्यांना कुठे बोलावले होते. तर ते आपल्याला त्यांच्या लग्नात बोलावतील. त्यानंतर हे दोघेजण खूप हसतात.... सुगंधा संकेतला म्हणते की, आपण जेव्हा लग्न केले तेव्हा करोनामुळे जास्त लोकांना बोलावता आले नव्हते. परंतु विकी आणि कतरिनाने तर त्यांच्या लग्नात फार कुणालाच आमंत्रित केलेले नाही. त्यावर संकेत म्हणतो म्हणूनच त्यांच्या लग्नाच्या संदर्भात रोज नवीन नवीन बातम्या येत आहेत. त्यात अनेक बातम्या तर लग्नसोहळ्यासाठी या गोष्टीला परवानगी नाही, त्या गोष्टीला परवानगी नाही असे सांगितले जाते... न जाणो उद्या अशीही बातमी येईल की, विकीच्या लग्नामध्ये त्यालाच येण्याची परवानगी नाही...यावर हे दोघे खूप हसू लागतात. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कतरिना आणि विकीचे लग्न ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत सवाई माधोपूर येथील सेंसेस फोर्ट बरवारामध्ये होणार आहे. लग्नसोहळ्यासाठी १२० जणांनाच बोलावण्यात आले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lyRzMA