मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता याचा मुलगा नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. अहानचा पहिलाच चित्रपट '' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अहानवर देखील नेपोटिझम किड असल्याचा ठप्पा लागला आहे. मात्र आपल्यावर लागलेला हा ठप्पा अहान कुठेतरी पुसताना दिसतोय. कारण अहानचा चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतोय. इतकंच नाही तर यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या तुलनेत अहानचा 'तडप' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये प्रदर्शनापूर्वीपासूनच उत्साह पाहायला मिळत होता. परंतु, पहिल्याच दिवशीच्या कमाईने चित्रपट प्रेक्षकांना पसंत पडत असल्याची पावती दिली आहे. 'तडप' चित्रपटाने पहिल्या दिवशी ४ कोटी पाच लाखांचा गल्ला जमवला होता. आता चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीची कमाई देखील समोर आली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४ कोटी २५ लाखांची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ८ कोटींची चांगली कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने केलेली कमाई पाहून रविवारीदेखील 'तडप' चांगली कमाई करेल असं बोललं जातंय. हा चित्रपट देशात १ हजार ६५६ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. याशिवाय सध्या 'अंतिम' आणि सत्यमेव जयते २' देखील चित्रपटगृहात आहे. परंतु, त्यांची कमाई आता थंडावली आहे. पण 'तडप' चित्रपटात कोणताही मोठा अभिनेता नसूनही चित्रपटाने केलेली कमाई चांगली मानली जात आहे. चित्रपटात अहानसोबत अभिनेत्री तारा सुतारीया देखील आहे. चित्रपटातील ताराची भूमिका कमी असली तरी तिनेही मिळालेल्या स्क्रिन टाइममध्ये चांगली कामगिरी केली असल्याचं बोललं जातंय. 'तडप' चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट 'आरएक्स १००' चा हिंदी रिमेक आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31vHLvY