मुंबई- बॉलिवूड अभिनेता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आयुष आणि सलमान खान यांचा '' चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटातील आयुषच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुक झालं. 'अंतिम' चित्रपटाने बॉक्स ऑफसवरही चांगली कमाई केली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुषने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीचे काही खुलासे केले. सलमानला भेटण्यापूर्वी आपण बॉलिवूडमध्ये अनेक छोटी- मोठी कामं केल्याचं आयुषने सांगितलं. त्यासोबतच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या एका चित्रपटात बॅकग्राउण्ड डान्सर म्हणूनही काम केल्याचं त्याने म्हटलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आयुषने सांगितलं की, कॉलेजमध्ये असताना आयुष अनेक जाहिराती आणि टीव्ही मालिकांसाठी ऑडिशन देत असे. आयुषने रणबीर आणि दीपिका यांच्या 'ये जवानी हे दिवानी' चित्रपटातील 'दिल्लीवाली गर्लफ्रेण्ड' गाण्यामध्ये बॅकग्राऊण्ड डान्सर म्हणून काम केलं आहे. 'ये जवानी हे दिवानी' चित्रपटाला आता आठ वर्ष झाली आहेत. आयुष म्हणाला, 'मला माहीत पडलं की मेहबूब स्टुडिओ मध्ये 'ये जवानी हे दिवानी' चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. मी माझ्या मित्राला फोन करून म्हणालो की, मला बॅकग्राऊण्डला काम करायला मिळालं तर मी पण शिकेन की चित्रीकरण कसं होतं. तेव्हा मी पहिल्यांदा रणबीर आणि दीपिका यांना काम करताना पाहिलं. तेव्हा पहिल्यांदाच मी मेहबूब स्टुडिओ पाहिला होता.' २०१८ साली आयुषने सलमानची बहीण अर्पिता हिच्यासोबत लग्न केलं. त्याच वर्षी आयुषने 'लव यात्री' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र समीक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रियांनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तर 'अंतिम' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३० कोटींची कमाई केली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DqfLHj