Full Width(True/False)

करिना कपूर टॉप, जाणून घ्या कोणत्या नंबरवर आहे कतरिना

मुंबई- Yahoo दरवर्षी सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या स्टार्सची यादी प्रसिद्ध करतं. यावर्षीही त्यांनी २०२१ मध्ये सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या सेलिब्रिटींची यादी शेअर केली आहे. या यादीत पुरुष सेलिब्रिटींसोबतच महिला सेलिब्रिटींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात वर्षभरात कोणत्या अभिनेत्री टॉप सर्चमध्ये होत्या हे सांगण्यात आलं. यंदा करिना कपूरचं नाव आघाडीवर आहे. २०२१ मध्ये दुसऱ्यांदा आई झाली. २०२१ मध्ये करिना गरोदरपणातही काम करत होती. याचमुळे ती अनेक महिने चर्चेत होती. याशिवाय प्रेग्नसीनंतरही करिना मुलामुळे चर्चेत राहिली. महिला स्टार्सच्या यादीत करिना कपूर २०२१ मध्ये सर्वाधिक सर्च केलेली अभिनेत्री ठरली आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे, जी या वर्षी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. अलीकडे कतरिना तिच्या 'सूर्यवंशी' चित्रपटामुळे चर्चेत होती. कतरिना कैफ विकी कौशलसोबत लग्न करणार आहे. राजस्थानमध्ये होणार्‍या या लग्नाच्या सुरक्षेचीही बरीच चर्चा आहे आणि त्यामुळेच या यादीत कतरिना कैफ दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत देसी गर्ल प्रियांका चोप्रा तिसऱ्या तर आलिया भट्ट चौथ्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे दीपिका पादुकोणने पाचव्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3onENCy