Full Width(True/False)

WhatsApp: सरकारने उपलब्ध केली खास सुविधा, WhatsApp च्या एका मेसेजवर उपलब्ध होणार डॉक्टर; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप चा वापर करणाऱ्या यूजर्ससाठी महत्त्वाची सेवा उपलब्ध झाली आहे. आता यूजर्स WhatsApp च्या माध्यमातून डॉक्टरचा सल्ला घेऊ शकतील. यासाठी केवळ एक मेसेज करावा लागेल. केंद्र सरकारच्या च्या कॉमन सर्व्हिस सेंटरने हेल्थ सर्व्हिस डेस्कची स्थापना केली आहे. वाचा: या सर्व्हिसला खासकरून ग्रामीण भागातील लोकांसाठी सुरू करण्यात आले आहे. जेणेकरून, त्यांना उपलब्ध होईल. WhatsApp वरील ही सेवा एक चॅटबोट सर्व्हिस आहे. WhatsApp वर मिळणार सुविधा WhatsApp च्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या हेल्प डेस्कद्वारे नागरिकांना अनेक सुविधा मिळतील. यात प्रशासनाची मदत घेणे, डॉक्टरांचा सल्ला, कोविड संबंधित माहितीचा समावेश आहे. WhatsApp च्या माध्यमातून उपलब्ध झालेली ही सेवा पूर्णपणे मोफत असून, यासाठी यूजर्सला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. सध्या ही सुविधा हिंदी व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. या सुविधेचा उपयोग करण्यासाठी यूजर्सला ७२९००५५५५२ हा नंबर मोबाइलमध्ये सेव्ह करून WhatsApp च्या माध्यमातून Hi मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर डॉक्टरांशी कनेक्ट करण्याचा पर्याय मिळेल. WhatsApp वर सुरू झालेल्या या सर्व्हिसबाबत सीएससीचे म्हणणे आहे की, या हेल्पडेस्कचा उद्देश सामाजिक, आर्थिक आणि डिजिटलरित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्य सुविधा उपलब्ध करणे आहे. या हेल्पडेस्कद्वारे कोविड-१९ संबंधित वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध केल्या जातील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3G7VzLY