नवी दिल्ली : डिजिटल काळात खासगी डेटा सुरक्षित ठेवणे ही एक मोठी जबाबदारी आहे. हॅकर्स तुमची खासगी माहिती चोरी करून बँक खाते रिकामे करू शकतात. तुमचा डेटा वेब ब्राउजरच्या मदतीने देखील चोरी केला जातो. त्यामुळे एक सुरक्षित वेब ब्राउजरचा वापर करणे गरजेचे आहे. सध्या आपल्या प्रायव्हसी फीचरसाठी Brave नावाचे एक ब्राउजर चर्चेत आहे. या ब्राउजरविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Brave एक फास्ट आणि सिक्योर ब्राउजर आहे. हा ब्राउजर पॉप-अप जाहिराती देखील दाखवत नाही. यात स्वतःचे सर्च इंजिन दिले असून, जे यूजर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित ठेवते. हे ब्राउजर ट्रॅकर आणि थर्ड पार्टी कुकीजला ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करण्यापासून देखील रोखते. तसेच, जाहिराती, कुकीजपासून ते फेसबुक आणि गुगल लॉग इनपर्यंत कशाला ब्लॉक करायचे आहे, याचा कंट्रोल देखील यूजरला मिळतो. तुम्ही विचार करत असाल की ब्राउजर जाहिरातीच दाखवत नसेल, तर कॉन्टेंट क्रिएटर्सची कमाई कशी होईल? रिपोर्टनुसार, यूजर्सला सुविधा देते की, वेबसाइट्सच्या माध्यमातून योगदान देता येईल व वेबसाइट्स निर्मात्यांना क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून कमाई होईल. तसेच, वेब ब्राउजरमध्ये जाहिराती आणि ट्रॅकिंगची देखील परवानगी देऊ शकता. त्यानंतर जाहिराती पाहून कमाई करता येईल. एवढेच नाही तर Brave ब्राउजरचे स्वतःचे सर्च इंजिन देखील आहे. ब्राउजरने Brave Search नावाने एक पब्लिक बीटा व्हर्जन जारी केले आहे. तुम्ही ब्रेव सर्च इंजिनचा डेस्कटॉपवर देखील वापर करू शकता. मात्र, स्मार्टफोनवर वापरण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. हे ब्राउजर सध्या Windows, MacOS, Android आणि iOS सारख्या प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lJ3w2C