मुंबई- बॉलिवूडचा भाईजान असलेला अभिनेता याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सलमानने अनेक हिट चित्रपट देऊन चाहत्यांची मनं जिंकली. सध्या सलमानचा 'अंतिम' सोशल मीडियावर चर्चेत आहे. परंतु, अशातच सोशल मीडियावर सलमान आणि याचा एक किस्सा व्हायरल होत आहे. अरहान हा अभिनेत्री आणि सलमानचा भाऊ आणि अभिनेता यांचा मुलगा आहे. सलमानचं अरहानवर प्रचंड प्रेम आहे. त्यांचं नातंही खूप घट्ट आहे. मात्र एके दिवशी सलमानच्या वागणुकीमुळे अरहान त्याला मारायला धावला होता. हा किस्सा आहे 'दबंग' चित्रपटादरम्यानचा. तेव्हा सलमान आणि अरबाज 'दबंग' चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. चित्रपटात अरबाजच्या वागण्याला कंटाळून सलमान त्याला मारतो, असा सीन दाखवण्यात आला आहे. सीनच्या चित्रीकरणादरम्यान अरबाजचा मुलगा अरहानदेखील सेटवर उपस्थित होता. सीनचं चित्रीकरण झाल्यानंतर अरहान सलमानच्या अंगावर धावत गेला आणि त्याला मारायची सुरुवात केली. अरहानच्या वागण्यावर सलमानदेखील चकित झाला. सलमानने त्याला कारण विचारल्यावर अरहान म्हणाला, 'तू माझ्या वडिलांना मारलं.' यावर सलमानने त्याला समजावलं आणि अरहानला प्रेमाने जवळ घेतलं. आजही अरहान आणि सलमान एकमेकांच्या जवळ आहेत. अरहान नेहमी सलमान आणि अरबाजला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात असतो. अरहान सध्या त्याच्या आईसोबत जुहू येथे राहतो. मात्र त्याचे आणि खान कुटुंबाचे संबंध घट्ट आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3GmwTPU