नवी दिल्लीः गुगलवर काहीही सर्च करणे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. अनेकदा आपण गंमत म्हणून काहीही सर्च करून पाहत असतो. परंतु, असे चुकूनही करू नका. गुगलवर सिक्योरिटी खूपच अलर्ट असते. सिक्योरिटीवरून कंपनीची वेगवेगळी पॉलिसी आहे. ज्याला अॅग्रेसिव्हली फॉलो केले जाते. गुगल ज्या देशातून ऑपरेट केले जाते त्या ठिकाणचे नियम पालन करते. त्यामुळे गुगलवर काहीही सर्च करणे चांगलेच तुम्हाला अडचणीत आणू शकते. जर तुम्ही गुगलवर या ६ गोष्टी चुकूनही सर्च केल्या तर तुम्हाला भारी पडू शकतात. जाणून घ्या या सहा गोष्टी. चाइल्ड पॉर्न भारत सरकारकडून या टॉपिकवर कडक नियम घातले गेले आहेत. जर तुम्ही गुगलवर हे टॉपिक सर्च केले तर तुम्हाला पास्को अॅक्ट २०१२ नुसार सेक्शन १४ अंतर्गत ५ वर्ष ते ७ वर्षांपर्यंत जेलची शिक्षा होऊ शकते. गुगलवर तुम्हाला चाइल्ड पॉर्न पाहणे किंवा शेअर करणे भारी पडू शकते. कोणत्याही पीडितेचे नाव आणि फोटो शेअर करणे कोणत्याही पीडित व्यक्तीचा फोटो किंवा नाव शेअर करणे किंवा छेडछाड वा दुर्व्यवहार झाला असेल, तर त्याला शेअर करणे बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, हे करणे दंडणीय आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडिया वर कोणत्याही महिलेचा फोटो पोस्ट करणे बेकायदेशीर आहे. तुम्हाला यासाठी जेलची शिक्षा होऊ शकते. फिल्म पायरेसी जर तुम्ही फिल्म पायरेसी करीत असाल तर हे सिनेमाटोग्राफी अॅक्ट १९५२ च्या अंतर्गत गुन्हा असून यासाठी कमीत कमी ३ वर्षाची शिक्षा होऊ शकते. तसेच १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गर्भपात जर तुम्ही गुगलवर गर्भपात संबंधी माहिती शोधत असाल तर हे बेकायदेशीर आहे. असे केल्यास तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. खासगी फोटो आणि व्हिडिओ फक्त गुगलवर नव्हे तर कोणाच्याही परवानगीशिवाय, फोटो किंवा व्हिडिओ बनवल्यास तसेच ते शेअर केल्यास गुन्हा आहे. तुम्हाला यासाठी जेलची हवा खावी लागू शकते. बॉम्बची प्रोसेस जर तुम्ही गुगलवर हे सर्च करीत असाल तर ते तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. बॉम्ब कसा तयार करणे हे सर्च केल्यास तुमची जेलची हवा पक्की ठरू शकते. त्यामुळे चुकूनही असे काही करू नका ज्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mx9W5b