मुंबई: मराठी रंगभूमीसाठी सातत्यानं काही नवं करणारे अभिनेते आणि निर्माते म्हणून यांना ओळखलं जातं. त्यांच्या ‘’ या नाटकाचे लवकरत ५०० प्रयोग पूर्ण होणार आहेत. असं असलं तरी अनेकांना प्रशांत दामले यांनी नवीन भूमिका कराव्यात असं वाटतं. प्रेक्षक आणि चाहते सोशल मीडियावर व्यक्त होतातही. पण नुकतंच एका चाहत्यानं प्रशांत दामले यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. एका युझरनं प्रशांत दामले यांच्या एका पोस्टवर कमेंट केली. ही कमेंट सध्या चर्चेत आली आहे. 'काही तरी नवीन करा सर, किती वर्ष तेच' असं एका युझरनं लिहिलं होतं. यावर प्रशांत दामले यांनीही भन्नाट उत्तर दिलं आहे. ' नोव्हेंबर २०१८मध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग केलाय. मध्ये २० महिने वाया गेलेत. तुम्हाला वाटतंय ते ... हे 'एका लग्नाची पुढची गोष्ट' हे नाटक आहे', असा भन्नाट रिप्लाय दामले यांनी दिला आहे. मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि ही सदाबहार जोडी आणि त्यांची ऑनस्टेज केमिस्ट्री ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचं खरं वैशिष्ट्य आहे. ‘नाटक पुन्हा-पुन्हा पाहणाऱ्या प्रेक्षकांनी या नाटकाला खऱ्या अर्थानं आपल्या मनात स्थान दिलं आहे. या नाटकानं मिळवलेलं हे यश रसिकांनी आमच्यावर केलेल्या प्रेमाचं प्रतीक आहे. लॉकडाउननंतर जेव्हा या नाटकानं मराठी रंगभूमीचा पडदा उघडला तेव्हासुद्धा रसिकांनी प्रेमाचा वर्षाव केला. पुढे आणखी मोठी मजल मारायची आहे. तेव्हाही रसिकांची अशीच साथ मिळेल अशी आशा आहे,’ असं दामले सांगतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3suJBsh