नवी दिल्ली : १ डिसेंबरपासून चे रिचार्ज प्लान महाग झाले आहेत. पूर्वीपेक्षा चे प्लान ७०० रुपयांपर्यंत महाग झाले आहेत. याशिवाय जिओने काही नवीन रिचार्ज प्लान देखील आणले आहेत. तसेच, काही प्लानमधील उपलब्ध फायदे बदलण्यात आले आहेत. तुम्ही Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला किंमत वाढवल्यानंतर जिओचा सर्वात किफायतशीर प्लान कोणता आहे आणि त्यात तुम्हाला कोणते फायदे मिळतील याबद्दल सविस्तर माहिती देणार आहो. वाचा: ७५ रुपयांच्या प्लानमध्ये २३ दिवसांची वैधता, मोफत कॉलिंग आणि डेटा: Reliance Jio चा हा सध्याचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान आहे. हा जिओ फोन प्लान आहे. Jio च्या ७५ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये २३ दिवसांची वैधता उपलब्ध आहे.यात कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच, यात १०० एमबी डेटा देखील उपलब्ध आहे. याशिवाय २०० MB अधिक डेटा देण्यात आला आहे. म्हणजेच या प्लान एकूण २.५ GB डेटा देण्यात आला आहे.सोबतच, ५० मेसेजेसची सुविधा देखील तुम्हाला यात मिळेल. तसेच प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाईल. किंमत वाढण्यापूर्वी, रिलायन्स जिओच्या ७५ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता उपलब्ध होती. याशिवाय प्लानमध्ये एकूण ३ GB डेटा देण्यात आला होता. ११९ रुपयांचा प्लान , २१ GB डेटा आणि फ्री कॉलिंग: Reliance Jio चा हा प्लान आधी ९८ रुपयांचा होता. आता हा प्लान ११९ रुपयांचा झाला आहे. या प्लानमध्ये यूजर्सना १४ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये यूजर्सला दररोज १.५ GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लानमध्ये एकूण २१ GB डेटा उपलब्ध आहे. तसेच, कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील यात उपलब्ध आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे जिओच्या या प्लानमध्ये मेसेजेसची सुविधा उपलब्ध नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31kCM1t