नवी दिल्ली : ऑनलाइन शॉपिंग प्लेटफॉर्म वर आजपासून सेलला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये तुम्ही कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सपर्यंत अनेक वस्तू डिस्काउंटसह खरेदी करू शकता. तुम्ही जर घेण्याचा विचार करत असाल तर सेलमध्ये लेनोवोच्या २-इन-१ लॅपटॉपवर तब्बल ९३ हजारांची सूट मिळत आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: ला फ्लिपकार्टवरून खूपच कमी किंमतीत खरेदी करता येईल. या लॅपटॉपची किंमत १,५१,५५७ रुपये आहे. परंतु, ४७ टक्के डिस्काउंटनंतर ७९,९९० रुपयात उपलब्ध होईल. तसेच, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास ४ हजार रुपये अतिरिक्त सूट मिळेल. म्हणजेच, या लॅपटॉपची किंमत आणखीन कमी होऊन ७५,९९० रुपये होईल. एवढेच नाही तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा देखील पर्याय मिळतो. तुम्ही जुना लॅपटॉप बदलल्यास १८,१०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. मात्र, ही ऑफर लॅपटॉपच्या मॉडेलवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास याची किंमत ७५,९९० रुपयांवरून थेट ५७,८९० रुपये होते. म्हणजेच, एकूण ९३,६६७ रुपयांच्या डिस्काउंटसह फोन खरेदी करता येईल. Lenovo Core i5 11th Gen Thinkbook 14s Yoga 2-in-1 चे फीचर्स Core i5 11th Gen Thinkbook 14s Yoga 2-in-1 Laptop ला तुम्ही टॅबलेटप्रमाणे देखील वापरू शकता. हा लॅपटॉप विंडोज १० होमवर काम करतो. यात ८ जीबी रॅमसह ५१२ जीबी एसएसडी स्टोरेज दिले आहे. यात १४ इंच फुल एचडी आयपीएस ग्लॉसी अँटी-फिंगरप्रिन्ट डिस्प्ले आणि फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे. तीन वर्षांच्या प्रीमियर वॉरंटीसह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये तुम्हाला ७२० पिक्सलचा एक वेब कॅमेरा देखील मिळेल, जो प्रायव्हसी शटर आणि फिक्स्ड फोकससह येतो. लॅपटॉप वजनाला हलका असून, एकदा फुल चार्ज केल्यानंतर ८.४ तास वापरू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xS2Cpa