Full Width(True/False)

प्रेक्षकांना काय कळतंय! 'मन झालं बाजिंद' मध्ये पुन्हा घोडचूक,MEMS व्हायरल

मुंबई- छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या खासकरून गृहिणींच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संध्याकाळचा वेळ खास मालिकांसाठी राखून ठेवलेला असतो. प्रेक्षक आपल्या मालिकांच्या कथांसोबत अक्षरशः जोडला जातो. मालिकेतील पात्र आपल्या आयुष्यातील कुणीतरी आहेत असं समजून त्यांच्यासाठी आनंदित किंवा दुखी होतो. मात्र कधीतरी मालिकांमध्ये होणाऱ्या चुका पाहिल्यानंतर प्रेक्षकही राग व्यक्त करतात. मालिकांमध्ये घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींवरही प्रेक्षकांचं अगदी बारीक लक्ष असतं. त्यामुळेच अनेकदा मालिका सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. अशीच एक चूक घडलीये '' या मालिकेत'. झी मराठीवरील 'मन झालं बाजिंद' मालिका काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रोमोपासूनच ही मालिका सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. मात्र पुन्हा एकदा मालिकेच्या टीमकडून एक चूक घडली आणि त्यावेळेसही प्रेक्षकांच्या नजरेतून ती सुटलेली नाही. मालिकेत राया आणि कृष्णाच्या लग्नानंतर वऱ्हाडाची गाडी खोल दरीत कोसळते. कुणालाही दुखापत होत नाही. मात्र कृष्णा बेपत्ता होते. कृष्णाला दुसराच व्यक्ती इस्पितळात भरती करतो. कृष्णावर उपचारही होतात. यानंतर मात्र टीमकडून चूक झाली आहे. जेव्हा कृष्णा बेशुद्ध अवस्थेत असते तेव्हा कृष्णाच्या डोक्याच्या उजव्या बाजूला दुखापत झालेली दाखवण्यात आली आहे. परंतु, जेव्हा कृष्णा शुद्धीत येते तेव्हा मात्र तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूला पट्टी दाखवण्यात आली आहे. मालिकेच्या टीमकडून झालेली ही चूक प्रेक्षकांच्या ध्यानात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा झी मराठीचे प्रेक्षक मालिका आणि वाहिनीला ट्रोल करत आहेत. प्रेक्षकांना काय काळतं, प्रेक्षक मूर्ख आहेत, काहीही दाखवलं तरी चालेल या भावनेने हे मालिका बनवतात, अशी टीका सध्या प्रेक्षकांकडून केली जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31yjTaJ