नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी BSNL भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा जास्त प्रीपेड प्लान ऑफर करते. अलीकडे, Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea , Vi ने प्रीपेडचे दर २० ते २५ रुपयांनी वाढवले आहेत. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या प्लानबद्दल सांगणार आहोत. या प्लानची तुलना Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या १७९ रुपयांच्या प्लानसोबत केली असता सर्वात चांगला प्लान कोणता असेल ते जाणून घ्या. वाचा: BSNL १८७ रुपयांचा प्लान : २८ दिवसांच्या वैधतेसह या BSNL प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजेस उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये दररोज २ GB डेटा दिला जातो. हायस्पीड डेटा संपल्यानंतर इंटरनेट ८० kbps च्या वेगाने चालते. यामध्ये मोफत PRBT रिंगटोन देखील उपलब्ध आहे. हा पॅक बीएसएनएल वेबसाइट आणि थर्ड पार्टी अॅप्लिकेशनद्वारे रिचार्ज केला जातो. Jio १७९ रुपयांचा प्लान : यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह दररोज १ GB डेटा दिला जातो. यामध्ये एकूण २४ GB डेटा आणि १०० मेसेजेस दिले जातात. यात २४ दिवसांची वैधता देण्यात आली आहे. सोबत,Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चा अॅक्सेस देण्यात आला आहे. Airtel १७९ रुपयांचा प्लान : यात एकूण २ GB डेटा देण्यात आला आहे. सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह एकूण ३०० मेसेजेस यात मिळतील. या प्लानमध्ये, मोफत Amazon Prime Video Mobile Edition सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी उपलब्ध आहे. या प्लानमध्ये मोफत कॉलर ट्यून आणि विंक म्युझिकचा प्रवेश समाविष्ट आहे. प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. Vi १७९ रुपयांचा रिचार्ज: या प्रीपेड प्लानमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह २ GB डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. त्याच वेळी, या प्लानमध्ये एकूण ३०० एसएमएस दिले आहेत. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लानमध्ये Vi Movies आणि TV बेसिक ऍक्सेस देण्यात आला आहे. BSNL च्या या प्लानमध्ये इतर कंपन्यांच्या प्लानपेक्षा जास्त फायदे दिले जातात. यामध्ये एकूण ५६ GB डेटा देण्यात आला आहे. अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजेस दिले जातात. तसेच, याची वैधता २८ दिवसांची आहे. बीएसएनएलच्या या प्लानमध्ये जिओच्या तुलनेत दुप्पट आणि इतर कंपन्यांच्या तुलनेत अनेक पट अधिक डेटा आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GjAQ82