नवी दिल्ली: जवळ- जवळ प्रत्येक वयोगातील व्यक्ती हे प्लॅटफॉर्म वापरत असल्यामुळे WhatsApp हे जगातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. गुगल प्ले-स्टोअरवरील रँकिंग आणि डाउनलोडिंगच्या आकडेवारीवरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या प्लॅटफॉर्मवर फेक मेसेज, फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात. वाचा: अशाच फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप कठोर पावले उचलत आहे. अशात तुम्हाला देखील काही गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट बॅन होऊ शकते. फेक whatsapp अकाउंट : व्हॉट्सअॅपच्या गाइडलाइन्समध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, जर युजर्सने फेक व्हॉट्सअॅप अकाउंट बनवले, तर व्हॉट्सअॅप त्या यूजर्सवर कायमचे बॅन करेल. त्यामुळे असे काहीही करू नका. स्पॅम मेसेज पाठवणे : जर कोणी तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसेल आणि तुम्ही त्याला सतत मेसेज पाठवत असाल तर अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅप तुमच्यावर कायमची बंदी घालेल. तुम्ही पुन्हा WhatsApp वापरू शकणार नाही. एवढेच नाही तर, जर तुम्ही बल्क मेसेजिंग, ऑटो-मेसेजिंग, ऑटो-डायलिंग इत्यादी बेकायदेशीर किंवा अयोग्य संप्रेषणात असल्याचे आढळल्यास तुमचे खाते देखील बंद केले जाईल. GBWhatsApp सारखे अॅप वापरणे: WhatsApp तुमच्यावर WhatsApp Delta, GBWhatsApp आणि WhatsApp Plus सारखे Third Party Apps वापरण्यासाठी कायमची बंदी घालू शकते. कंपनीचा असा विश्वास आहे की, अशा थर्ड-पार्टी अॅप्सचा वापर करून युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक होऊ शकतो. फेक मेसेज आणि व्हिडिओ पाठवणे: WhatsApp हिंसाचार पसरवण्याच्या उद्देशाने मेसेज पाठवणाऱ्या युजर्सच्या खात्यांवर देखील बॅन आणते. यासोबतच, फेक फोटो आणि व्हिडीओ पाठवणाऱ्या यूजर्सनाही ब्लॉक करण्यात येते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3y8VqVN