Full Width(True/False)

Tweet- आर माधवनने 3 Idiots वरून उडवली चेतन भगतची खिल्ली

मुंबई- बॉलिवूडमधील काही सर्वोत्कृष्ट आणि लोकप्रिय चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर , आर माधवन, बोमन इराणी आणि शर्मन जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला '' सिनेमा नक्कीच टॉप ५ मध्ये असेल. हा सिनेमा इतका लोकप्रिय आहे की आजही टीव्हीवर लागला तर चाहते पुनः पुन्हा पाहतात. चेतन भगतच्या '५ पॉइंट समवन' या कादंबरीवर सिनेमाची कथा आधारित आहे. आता याच मुद्द्यावरून सिनेमातील अभिनेता याने सोशल मीडियावर चेतन भगतची खिल्ली उडवली. त्याचं झालं असं की चेतन भगतने सोशल मीडियावर एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये चेतनने लिहिले की, 'तुम्ही कधी एखाद्याला असं म्हणताना ऐकलं आहे का की पुस्तकापेक्षा चित्रपट चांगला आहे?' या ट्वीटला रिट्वीट करत आर माधवनने लिहिले, 'होय, ३ इडियट्स.' इथे पाहा माधवनचे ट्वीट पहा: माधवनच्या या उत्तरानंतर ट्विटर युजर्सनीही चेतनची खिल्ली उडवायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले, '३ इडियट्स, हाफ गर्लफ्रेंड आणि २ स्टेट्स... हे सिनेमे पुस्तकांपेक्षा चांगले आहेत. या पुस्तकांबद्दल लोकांना कळलं इतके हे सिनेमे चांगले होते. दुसर्‍या यूजरने लिहिले, 'पुस्तक वाईट होते, सिनेमा उत्कृष्ट होता. अगदी चेतन भगतही मान्य करतील. राजकुमार हिरानी दिग्दर्शित '३ इडियट्स' सिनेमा २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर सवाल उपस्थित करणारा होता. आमिर, माधवन, बोमन, शरमन यांच्यासोबत या सिनेमात करिना कपूर आणि मोना सिंग यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3J4Y6J7