Full Width(True/False)

Budget Smartphone: गिफ्ट देण्यासाठी बेस्ट! ४ GB रॅमसह येणाऱ्या 'या' स्मार्टफोनची किंमत केवळ ५,४९९ रुपये, पाहा फीचर्स

नवी दिल्ली: जर तुम्ही घरातील मोठ्यांना स्मार्टफोन गिफ्ट म्हणून देण्याचा विचार करत असाल, ज्यामध्ये गरजेनुसार सर्व फीचर्स मिळतील. तसेच, त्याची किंमतही खूप कमी असेल, तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. (SKY BLUE, 32 GB) (4 GB RAM) स्मार्टफोन ६,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. वाचा: I Kall Z4 (SKY BLUE, 32 GB) (4 GB RAM): तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर फक्त ५,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या स्मार्टफोनवर अनेक बँक ऑफर्स देखील आहेत. ज्यात, तुम्हाला पूर्ण ५ टक्के अनलिमिटेड कॅश बॅक मिळू शकतो. हा कॅशबॅक तुम्हाला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ऑफर केला जाईल. जर तुम्हाला हा स्मार्टफोन EMI वर घ्यायचा असेल तर तुम्हाला दरमहा १९१ रुपये द्यावे लागतील. या स्मार्टफोनसह तुम्हाला १ वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी आणि ६ महिन्यांच्या बॉक्स अॅक्सेसरीजची वॉरंटी दिली जाते. काय आहे I Kall Z4 (SKY BLUE, 32 GB) (4 GB RAM) मध्ये खास? जर तुम्हाला या स्मार्ट फोनची खासियत जाणून घ्यायची असेल तर, यामध्ये यूजर्सना ४ GB RAM आणि ३२ GB रॉम ऑफर करण्यात आली आहे. जी, ६४ GB पर्यंत वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये ५.४५ -इंचाचा डिस्प्ले आहे. जो वापरताना युजर्सना महागडा स्मार्टफोन वापरत असल्याचा फील येईल . जर कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये ८-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. जर बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, यूजर्सना या स्मार्टफोनमध्ये ३००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी स्मार्टफोनसोबत बराच वेळ साथ देते. कमी बजेटमध्ये हा एक उत्तम स्मार्टफोन सिद्ध होऊ शकतो, जो गिफ्ट देण्यासाठी चांगला पर्याय आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rIbonc