मुंबई- 'बिग बॉस ओटीटी' ची स्पर्धक आणि अभिनेत्री अनेकदा चर्चेत असते. उर्फी कधी तिच्या ड्रेसमुळे तर कधी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे लाइमलाइटमध्ये असते. आता पुन्हा एकदा उर्फी जावेद चर्चेत आली आहे, पण यावेळचं कारण थोडं वेगळं आहे. यावेळी तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या बैठकीला हजेरी लावली होती. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हो हे खरं आहे, उर्फी जावेदच्या एका चाहत्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बैठक घेताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांच्यासमोर एक टीव्ही सुरू असून न्यूज चॅनेलवर उर्फी जावेदशी संबंधित बातम्या दाखवल्या जात आहेत. यात उर्फी गडद निळ्या रंगाच्या साडीत टीव्हीवर दिसत आहे. उर्फीने देखील हा फोटो तिच्या अकाउंटवर शेअर केला. फोटोसोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की, 'योगीजींसोबत या मीटिंगला उपस्थित राहून मला आनंद झाला. जेव्हा हा फोटो पहिला तेव्हा मी खूप हसले.' मध्यंतरी उर्फीने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं जे चांगलं चर्चेत आहे. ती म्हणाली होती की, 'मी मुस्लिम असलेले तरी कोणत्याही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही.' या निर्णयामागचं कारणही तिने यावेळी दिलं होतं. उर्फीने एका मुलाखतीत सांगितले की, 'मुस्लिम पुरुषांना नेहमीच त्यांच्या महिलांना नियंत्रणात ठेवायचं असतं. यामुळेच ती इस्लामला मानत नाही.' ती पुढे म्हणाली होती की, 'मला ट्रोल करणारे बहुतेक लोक मुस्लिम आहेत. बहुतेक द्वेषयुक्त टिप्पण्यादेखील त्यांच्याकडूनच येतात. मी इस्लामची प्रतिमा खराब करत आहे, असं त्यांना वाटतं. ते माझा द्वेष करतात.' मात्र, उर्फी कोणत्याही ठराविक धर्माचं पालन करत नसल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. भविष्यात ती कोणावर प्रेम करेल आणि कोणाशी लग्न करेल याची ती फार पर्वा करत नाही. उर्फी जावेद मुळची लखनऊला राहणारी आहे. २०१६ मध्ये तिने 'बडे भैया की दुल्हनिया' मधील अवनी पंतच्या भूमिकेतून करिअरची सुरुवात केली. ५ वर्षांच्या कारकिर्दीत तिने १० मालिकांमध्ये काम केलं आहे. उर्फी जावेदला अभिनयासोबतच नृत्याचीही खूप आवड आहे. 'बिग बॉस ओटीटी' मध्ये प्रवेश केल्यानंतर तिची लोकप्रियता वाढल्याचं उर्फीचं मत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3KCJZeN