नवी दिल्ली: भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे असणे गरजेचे आहे. मात्र, बाजारात बनावट आधार कार्ड देखील उपलब्ध होत असल्याचे समोर आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ला ४०० लोकांच्या बनावट आधार प्रकरणात माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सिव्हिल डिफेन्स ट्रेनिंगमध्ये बनावट आधारद्वारे रजिस्ट्रेशन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वाचा: सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, बँकिंगपासून ते शाळेपर्यंत सर्व ठिकाणी आधार कार्ड महत्त्वाचे कागदपत्र झाले आहे. वर्ष २००९ पासून आधार कार्ड जारी केले जात आहे. UIDAI ने नुकतेच बाजारात तयार केल्या जाणाऱ्या PVCC ला बॅन केले आहे. त्यामुळे तुमचे आधार कार्ड खरे आहे की बनावट, हे तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून जाणून घेऊ शकता. या स्टेप्सद्वारे तपासा आधारची सत्यता
- सर्वात प्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.
- येथे या ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर सर्व सर्व्हिसची लिस्ट येईल. यातील Verify an Aadhaar number हा पर्याय निवडा.
- आता तुम्हाला आधार कार्डवरील १२ आकडी नंबर एंटर करायचे आहे व कॅप्चा टाकून Proceed to Verify वर क्लिक करा.
- यानंतर तुम्ही पुढील पेजवर पोहचाल. जेथे वय, लिंग, राज्य आणि मोबाइल नंबरची माहिती असेल. याप्रकारे तुम्ही आधार कार्ड व्हेरिफाय करू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qRVlUA