Full Width(True/False)

Data Plans: एकच नंबर! फक्त १३ रुपयांत मिळतोय 'इतके' GB डेटा, BSNL चा हा इंटरनेट प्लान आहे सर्वात स्वस्त, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: जर तुम्ही युजर असाल तर तुम्हाला कंपनीकडून वेळोवेळी उत्कृष्ट प्लान्स दिले जात असतातच. प्रीपेड कनेक्शन युजर्ससाठी अनेक प्लान देखील BSNL कडे उपलब्ध आहेत. बीएसएनएल प्रीपेड प्लानमध्ये डेटासाठी देखील अनेक प्लान्स ऑफर करते.जर तुमचा डेटा अचानक संपला आणि तुमच्याकडे फक्त थोडासा डेटा आहे, तर अशा परिस्थितीत बीएसएनएल एक असा डेटा प्लान ऑफर करते जो तुमच्या डेटाची गरज काही मिनिटांत पूर्ण करू शकतो, खास गोष्ट म्हणजे या प्लानची किंमत इतकी कमी आहे की तुम्ही विश्वास बसणार नाही. वाचा: जाणून घ्या प्लान: जर तुम्ही विचार करत असाल BSNL चा असा कोणता प्लान आहे ज्यात डेटा संपल्यावर देखील वापरता येईल, तर कंपनी प्रीपेड यूजर्ससाठी १३ रुपयांचा डेटा पॅक ऑफर करते. तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट संपल्यानंतर हा डेटा पॅक खूप उपयुक्त ठरू शकतो. फक्त १३ रुपयांमध्ये मध्ये येत असल्याने, हा सर्वात स्वस्त डेटा प्लान आहे . जाणून घेऊया या प्लानची खासियत काय आहे. १३ रुपयांच्या या डेटा प्लानमध्ये तुम्हाला कॉलिंगपासून ते s.m.s बेनिफिट्स मिळत असतील असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे अजिबात नाही. कारण, या प्लानमध्ये तुम्हाला फक्त डेटा दिला जातो. या प्लानचा रिचार्ज करून ग्राहक पूर्ण २ GB डेटा मिळवू शकतात. या प्लानची वैधता फक्त १ दिवस आहे, त्यामुळे तुमचा डेटा अचानक संपला तर तुम्ही हा प्लान रिचार्ज करून इंटरनेट वापरू शकता. या डेटा प्लानमध्ये ना तुम्हाला कॉलिंगची सुविधा दिली जात आहे, ना एसएमएसची ऑफर. असे असले तरीही हा एक परवडणारा प्लान आहे. कारण, यातील डेटा तुमचे महत्त्वाचे काम करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33zMGgg