Full Width(True/False)

Free Sim Sard: BSNL चे नवीन वर्षाचे गिफ्ट, मोफत देत आहे ४जी सिम; ‘या’ ग्राहकांना मिळेल फायदा

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी ने पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना मोफत ४जी देत आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत आपल्या नवीन आणि मोबाइल नंबर पोर्टिबिलिटी करणाऱ्या ग्राहकांना मोफत ४जी सिम देत आहे. वाचाः कंपनीने याआधी ऑक्टोबर २०२२ पर्यंत या ऑफरची घोषणा केली होती. ही ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत होती. मात्र, आता मोफत ४जी सिम ऑफर ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवली आहे. रिपोर्टनुसार, कंपनीने केरळ सर्कलमध्ये ही मुदत वाढवली आहे. जर तुम्ही तुमच्या मोबाइल नंबरला बीएसएनएलमध्ये पोर्ट करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. तुम्हाला बीएसएनएल ४जी सिम कार्ड मोफत मिळेल. सिम सुरू करताना नवीन व एमएनपी ग्राहकांना केवळ रिचार्जची रक्कम द्यावी लागेल. कंपनीकडे १०६ रुपयाच्या सुरुवाती किंमतीपासून उपलब्ध आहेत. असे मोफत मिळेल बीएसएनएलचे ४जी सिम कार्ड बीएसएनएलचे मोफत सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकांना ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा अशी महत्त्वाची कागदपत्र जवळील बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्र अथवा बीएसएनएल रिटेलर शॉपकडे जमा करावी लागतील. दरम्यान, सध्या ही ऑफर केवळ बीएसएनएल केरळ टेलिकॉम सर्कलमध्येच उपलब्ध आहे. तसेच, मोफत सिम कार्ड घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र जमा करणे गरजेचे आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eTBOMM