Full Width(True/False)

Samsung Smartphone: फक्त ९९९ रुपयात बुक करू शकता Samsung चा दमदार ५जी स्मार्टफोन, मोफत मिळेल ‘हे’ स्मार्ट डिव्हाइस

नवी दिल्ली : ने आपल्या लेटेस्ट फ्लॅगशिप Galaxy S21 FE 5G ला सादर केले असून, हा हँडसेट प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. तुम्ही जर या फोनला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक शानदार ऑफर दिली जात आहे. तुम्ही १० जानेवारीपर्यंत या फोनला प्री-बुक करू शकता व यासाठी केवळ ९९९ रुपये टोकन अमाउंट द्यावी लागेल. वाचाः ला करू शकता प्री-बुक Samsung Galaxy S21 FE 5G ला आधीच बुक करण्यासाठी ९९९ रुपये टोकन अमाउंट द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला च्या ई-स्टोर वर जावे लागेल. तुम्ही www.samsung.com अथवा Samsung Shop वर देखील जाऊ शकता. या फोनचा सेल ११ जानेवारीला आयोजित केला जाईल. फोनला प्री-बुक करण्यासाठी Galaxy S21 FE 5G चा Next Galaxy VIP Pass दिला जाईल. याद्वारे यूजर्सला २,६९९ रुपयांचा Galaxy SmartTag मोफत मिळेल. तसेच, नंतर प्री-बुकिंग रद्द देखील करता येईल व १०० टक्के रिफंड मिळेल. Samsung Galaxy S21 FE 5G च्या भारतात किंमत किती असेल याचा खुलासा अद्याप कंपनीने केलेला नाही. परंतु, Samsung UK वेबसाइटनुसार, Samsung Galaxy S21 FE 5G च्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६९९ GBP (जवळपास ७०,२०० रुपये) आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ७४९ GBP (जवळपास ७५,२०० रुपये) असेल. Samsung Galaxy S21 FE 5G चे फीचर्स: सॅमसंगचा हा दमदार स्मार्टफोन अँड्राइड १२ वर आधारित वन यूआय ४ वर काम करतो. यामध्ये ६.४ इंच फुल एचडी+ डायनॅमिक एमोलेड २एक्स डिस्प्ले दिला आहे. यात ऑक्टाकोर चिपसेटसह ८ जीबीपर्यंत रॅम मिळेल. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात १२ मेगापिक्सल मुख्य सेंसर, १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड शूटर आणि ८ मेगापिक्सल टेलिफोटो शूटर मिळतो. फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तसेच, २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. पॉवरसाठी यात २५ वॉट वायर्ड चार्जिंग आणि १५ वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zsRakA