Full Width(True/False)

तू बाहेर ये! कार्तिकच्या घराबाहेर तरुणींचा गोंधळ, नंतर असं काही झालं की...

मुंबई: आवडत्या कलाकारासाठी चाहते काय करतील याचा नेम नसतो; तसंच कलाकारही कधी चाहत्यांना एखादं सरप्राइज देत चकीत करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुणी कार्तिक आर्यनच्या घराबाहेर उभ्या असून त्या कार्तिकनं तू बाहेर ये, असं जोर जोरात बोलताना दिसत आहेत. कार्तिकच्या या क्रेझी फॅन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. या दोन तरुणी कार्तिकला पाहाता यावं यासाठी त्याच्या घराजवळ थांबल्या होत्या. पण आवडत्या हिरोला एकदा भेटावं म्हणून त्यांनी हटते स्टाइलमध्ये प्रयत्न केले आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील आलं. आपल्या या जबऱ्या फॅन्सला निराश न करता तो त्यांना भेटण्यासाठी बाहेर आलाय.त्यानं त्यांच्यासोबत फोटोही काढल्या. या भेटीनंतर या दोन तरुणींच्या आनंदाला पारावाच उतला नाही. कार्तिकनं देखील हा व्हिडिओ शेअर करत 'हेच माझं जगण्याचं कारण आहे. तुम्ही आहात म्हणून मी आहे, चाहत्यांच्या प्रेमाची परतफेड करू शकत नाही, पण छोटा प्रयत्न करत असतो',असं कार्तिकनं म्हटलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिक त्याच्या आगामी चित्रपटाचं पुण्यात चित्रीकरण करत होता. हे चित्रीकरण एका कॉलेजमध्ये सुरू होतं. त्या दरम्यान कार्तिकला अचानक त्याच्या चाहत्यांशी फोनवर बोलण्याची लहर आली. एका चाहतीला त्यानं कॉल केला आणि ‘यश बोलतोय, कुठं आहे,’ असा प्रश्न केला. चाहतीनं त्याचा आवाज लगेच ओळखला आणि ‘तू कार्तिक बोलत आहेस ना,’ असं विचारून त्याची बोलतीच बंद केली. त्याला ‘हो’ असं उत्तर देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यानंतर मग त्यानं तिच्यासोबत भरपूर गप्पा मारल्या. कार्तिकच्या कामाबद्दल बोलायचं तर, पुण्यातलं चित्रीकरण संपवून तो दिल्लीला गेला. तिथं आगामी ‘शहजादा’ या चित्रपटाचं काम तो करत आहे. या चित्रपटासाठी त्यानं भरपूर तयारीही केली आहे. मध्यंतरी दोन बिग बजेट चित्रपटांतून त्याला बाहेर पडावं लागलं. संबंधित निर्मितीसंस्थांनी ते जाहीरही केलं. कार्तिकनं मात्र त्यावर काहीही भाष्य न करता आपलं काम करत राहण्याला प्राधान्य दिलं. इंडस्ट्रीत कुठलाही वशीला नसताना स्वतःची जागा निर्माण केली म्हणून त्याचं नेहमीच कौतुक होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qN2G6B