नवी दिल्ली : तुम्ही देखील ब्राउजरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारने क्रोम यूजर्सला चेतावणी जारी केली आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जेंसी रिस्पॉन्स टीमने () यूजर्सला त्वरित अपडेट करण्यास सांगितले आहे. जे यूजर्स क्रोम व्हर्जन ९७.०.४६९२.७१ पेक्षा जुने व्हर्जन वापरत आहेत, त्यांनी त्वरित अपडेट करणे गरजेचे आहे. असे यूजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर येऊ शकतात. वाचा: CERT-In ने म्हटले आहे की, ब्राउजरमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. क्रोम टाइप कंफ्यूझनमुळे वी८ मध्ये वापरण्यास सुरक्षित नाही. वेब अॅप, यूजर इंटरफेस, स्क्रीन कॅप्चर, फाइल एपीआय, ऑटो फिल आणि डेव्हलपर्स टूल्स सारख्या अनेक त्रुटी आढळल्या आहेत. सरकारनुसार, गुगल क्रोमला अपडेट न केल्यास डिव्हाइसला रिमोट हॅक केले जाऊ शकते. या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स हल्ला करू शकतात व क्रोम यूजर्सला थेट मॅलिशियस वेब पेजवर रिडायरेक्ट करू शकतात. हॅकर्सने या त्रुटींचा फायदा घेतल्यास डिव्हाइसमध्ये मॅलिशियस कोड रन करून खासगी माहिती चोरी केली जाऊ शकते. त्यामुळे यूजर्सला त्वरित क्रोम ब्राउजर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. असे अपडेट करा क्रोम ब्राउजर
- डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व यूजर्सने क्रोम ब्राउजर अपडेट करणे गरजेचे आहे.
- अपडेट करण्यासाठी क्रोम ब्राउजर ओपन करून Menu मध्ये जा.
- येथे Help पर्यायावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला About Chrome नावाचा पर्याय दिसेल.
- येथे गेल्यावर क्रोम ब्राउजर अपडेट होण्यास सुरुवात होईल.
- त्यानंतर रिलाँचवर क्लिक करा.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fci5Yw