नवी दिल्ली: वर सुरू झाला आहे. २७ जानेवारीपासून सुरू झालेला हा सेल ३१ जानेवारीपर्यंत चालेल. या सेलमध्ये आणि इतर स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये १० टक्के डिस्काउंट सिटी बँकेच्या कार्ड्सवर मिळत आहे. यासोबतच, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळतो. वाचा: Flipkart Sale मध्ये Apple वर आकर्षक ऑफरचा फायदा मिळत आहे. स्मार्टफोन २९ टक्के डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आला आहे. याशिवाय सिटी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर १० टक्के डिस्काउंट मिळेल सेलमध्ये iPhone 12 Mini चे ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ४१,९९९ रुपयात उपलब्ध आहे. बँक ऑफर अंतर्गत किंमत ४०,९९९ रुपये होते. याशिवाय फोनवर १५,८५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. तसेच, iPhone 12 Mini ला दरमहिना १,४३६ रुपये देऊन EMI वर देखील खरेदी करू शकता. iPhone 12 Mini मध्ये ५.४ इंच Super Retina XDR OLED स्क्रीन दिली आहे, जी Ceramic Shield Glass प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट (Nano + e-SIM) मिळतो. फोन आयओएस १४ वर काम करतो. हँडसेट ए१४ बायोनिक चिपसेटसह येतो, जो फोर्थ जनरेशन न्यूटरल इंजिनसह येतो. यामध्ये आयपी६८ रेटिंग, MagSafe Wireless चार्जिंग सपोर्ट मिळतो. कंपनीचा दावा आहे की, फोन सिंगल चार्जमध्ये १५ तासांच्या व्हिडिओ प्ले बॅकसह येतो. फोनमध्ये १२ मेगापिक्सल + १२ मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच, फ्रंटला १२ मेगापिक्सलचा ट्रूडेप्थ सेल्फी कॅमेरा मिळतो. फोन Night Mode, 4K Dolby Vision HDR रेकॉर्डिंगसह येतो. यात ५G, ४G LTE, WCDMA, GSM चा सपोर्ट मिळतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/flipkart-electronics-sale-iphone-12-mini-with-emi-and-exchange-offer/articleshow/89172463.cms