Full Width(True/False)

Oppo Smartphone: मस्तच! ओप्पो भारतात सादर करणार स्वस्तात मस्त स्मार्टफोन, किंमत असेल जवळपास १० हजार रुपये

नवी दिल्ली: निर्माता कंपनी लवकरच भारतात नवीन बजेट स्मार्टफोन ला लाँच करणार आहे. लाँचआधी स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. नवीन रिपोर्टमध्ये किंमत देखील लीक झाली आहे. ओप्पो ए१६के ला पहिल्यांदा नोव्हेंबरमध्ये फिलिपाइन्समध्ये लाँच केले होते. यात IPS LCD डिस्प्ले, MediaTek Helio G३५ प्रोसेसर आणि ४,२३०mAh ची बॅटरी मिळते. वाचा: संभाव्य किंमत रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनला एका व्हेरिएंटमध्ये लाँच केले जाईल. भारतात या फोनची किंमत १०,४९० रुपये असेल. लाँचनंतर हा फोन Realme Narzo 50A, Infinix HOT 11S, Samsung Galaxy M12 आणि TECNO SPARK 8 Pro ला टक्कर देईल. मिळेल वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले A16K स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह येणारा डिस्प्ले मिळेल. यात ६.५२ इंच एचडी+ IPS LCD डिस्प्ले मिळेल. यात ७२०x१६०० पिक्सल रिझॉल्यूशनचा सपोर्ट दिला जाईल. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ दिला जाईल. फोन ब्लॅक आणि ब्लू रंगात येईल. मीडियाटेक हीलियो जी३५ प्रोसेसरसह ३ जीबी रॅम आणि३२ जीबी स्टोरेज मिळेल. १३ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळेल, जो ८०-डिग्री FOV सह येईल. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल. फोन अँड्राइड ११ आधारित ColorOS ११.१ वर काम करतो. फोनमध्ये १० वॉट चार्जिंग सपोर्टसह ४,२३० एमएएचची बॅटरी दिली जाईल. या स्मार्टफोनला जानेवारीतच भारतात सादर केला जाण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nddcTw