नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनियां , आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक शानदार प्लान्स सादर करत असतात. या तिन्ही कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या प्लान्सचे दर वाढवले आहेत व याचा फायदा ला मिळत आहे. BSNL एकमेव कंपनी आहे, जिने प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. वाचाः BSNL कडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारा एक शानदार प्रीपेड प्लान आहे. या प्लानची किंमत १८७ रुपये आहे. Airtel, Jio आणि Vi कडे याच किंमतीच्या जवळपास असणारे काही प्लान्स आहेत. मात्र, यात बेनिफिट्स कमी मिळतात. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. BSNL चा प्लान बीएसएनएलच्या २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लानची किंमत १८७ रुपये आहे. यामध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यास ८० Kbps चा स्पीड मिळेल. सोबतच, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. Jio चा प्लान जिओच्या २०९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. Airtel चा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानची किंमत १७९ रुपये आहे. यात केवळ २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि Prime Mobile Edition चा अॅक्सेस मिळतो. Vi चा प्लान वीआयच्या प्लानची किंमत १७९ रुपये आहे. यात २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. वाचाः वाचाः वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f0wxDf